मुंबई 25 एप्रिल: राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाऊनंतरही मुंबईतला धोका कायम असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. राज्यात आज नवीन 811 रुग्ण सापडला त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 7 हजार 628 एवढी झाली आहे. तर मुंबईने पाच हजार रुग्णांचा टप्पा पार केला. आज मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या पाच हजार 49 एवढी झाली. तर आतापर्यंत 191 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आणखी काय करता येईल यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. तर देशात कोरोना बळींची संख्या 779 एवढी झाली असून कोरोनारुग्णांची संख्या 24,942 झाली आहे. राज्यात आज 22 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील मुंबईत 13 रुग्ण आहेत पुणे महापालिकेच्या हद्दीत चार तर मालेगाव येथील एक पुणे ग्रामीण मध्ये एक पिंपरी-चिंचवडमध्ये एक धुळे आणि सोलापूर शहरात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एक लाख आठ हजार 972 रुग्णांच्या तपासणी केल्या असून त्यात सात हजार 628 जण पॉझिटिव आहे. मुंबईत 24 तासात 602 रूग्ण आढळले आहेत. शुक्रवारी मुंबईत एकूण 4447 रूग्ण होते आज ती संख्या 5049वर गेली आहे. Lockdown : अडलेल्या लग्नाला पोलीस आले धावून, आई वडिलांच्या डोळ्याला लागल्या धारा देशभरातल्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा IIT दिल्ली अभ्यास करत असून त्यासाठी त्यांनी PRACRITI हा डॅशबोर्ड तयार केला आहे. देशातल्या सात राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त वेगाने कोरोना पसरत असल्याचं त्यात आढळून आलं असून त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. तर गुजरात या राज्यामध्ये इन्फेक्शन पसरण्याचं प्रमाण सर्वात जास्त असल्याचंही आढळून आलं आहे. कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहापासून Virusचा धोका; पतीच्या मृतदेह दफनावरून वाद कोर्टात सर्वाधिक वेगाने कोरोना पसरत असलेल्या राज्यांमध्ये झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आणि गुजरात ही ती राज्य असून देशातल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन तृतिआंश रुग्ण हे या राज्यांमध्ये आहेत. देशातल्या 19 राज्य आणि 100 जिल्ह्यांमध्ये 60 टक्के कोरोनाबाधित रुग्ण आहेत. गुजरातमध्ये कोरोनाबाधित रुग्णामुळे इन्फेक्शन पसरण्याचा वेग हा 3.3 एवढा असून तो देशात सर्वात जास्त आहे. तर अशा प्रकारचं इन्फेक्शन पसरण्याची राष्ट्रीय सरासरी ही 1.8 एवढी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.