नवी दिल्ली, 15 मे : कोरोनाव्हायरस (Coronavirus) ज्या देशातून आला, ज्या देशाने सर्वप्रथम या महासाथीचा प्रकोप पाहिला, त्या देशाला अर्थात चीनला भारताने आता मागे टाकलं आहे. भारतात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावाढीचा आलेख अद्याप सपाट झालेला नाही. याचा अर्थ भारतात या साथीने अद्याप टोक गाठलेलं नाही, तरीही रुग्णसंख्या 84,712 वर पोहोचली आहे.
जगभरात COVID-19 ची रुग्णसंख्या लक्षात घेता भारत 12 व्या स्थानावर आला आहे. हे स्थान आता आणखी वर चढू नये अशी अपेक्षा असली, तरी प्रत्यक्षात कोरोनाच्या फैलावाला देशव्यापी लॉकडाऊनसुद्धा आवर घालू शकलेला नाही. भारतात आता चौथा लॉकडाऊन लागण्याच्या मार्गावर आहे. देश सलग 2 महिने ठप्प आहे, तरीही कोरोनाचा प्रसार वाढतो आहे.
संबंधित - मुंबईत एका दिवसातल्या कोरोनाबळींचा उच्चांक; रुग्णसंख्याही गेली 17,512
आरोग्य तज्ज्ञ आणि साथीच्या रोगाचे तज्ज्ञ सांगतात की, भारताने कोरोना प्रसाराच्या वेगावर नियंत्रण मिळवलं आहे, पण हा प्रसार थांबवण्यात किंवा कमी करण्यात अद्याप देशाला यश आलेलं नाही.
भारताला कोरोनाव्हायरसच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवं, अशी धोक्याची सूचना आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर कोरोनाव्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक के. श्रीनाथ रेड्डी यांनी कोरोनाव्हायरसच्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत सावध केलं आहे. कोरोनाचं सामुदायिक ट्रान्समिशन झालं आहे की नाही परिभाषेवर अवलंबून आहे. जर आपण इतर देशात प्रवास न केलेल्या किंवा कोणत्या संक्रमित व्यक्तींच्या संक्रमित न आलेल्या लोकांमधीस संक्रमणाचा विचार केला, तर अशी बरीच प्रकरणं समोर आल्याचं ते म्हणालेत.
अन्य बातम्या
आता कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनसाठी तयार राहा; आरोग्य तज्ज्ञांनी केलं सावध
लॉकडाऊन 4.0 मध्ये मिळू शकते मोठी सूट, 11 राज्य करत आहेत प्लानिंग