बंगळुरू, 15 मे : भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांच्या पार गेला आहे, 2,500 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला तरीही व्हायरस संक्रमण झपाट्यानं होतं आहे. आता लॉकडाऊनमध्ये सरकारनं काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. मात्र हीच शिथीलता संकटात टाकू शकते, असा इशारा देशातील आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
भारतानं आता कोरोनाव्हायरसच्या कम्युनिटी ट्रान्समिशनचा (cornavirus community transmission) सामना करण्यासाठी तयार राहायला हवं, अशी धोक्याची सूचना आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर कोरोनाव्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक के. श्रीनाथ रेड्डी यांनी कोरोनाव्हायरसच्या कम्युनिटी ट्रान्समिशनबाबत सावध केलं आहे. कोरोनाचं सामुदायिक ट्रान्समिशन झालं आहे की नाही परिभाषेवर अवलंबून आहे. जर आपण इतर देशात प्रवास न केलेल्या किंवा कोणत्या संक्रमित व्यक्तींच्या संक्रमित न आलेल्या लोकांमधीस संक्रमणाचा विचार केला, तर अशी बरीच प्रकरणं समोर आल्याचं ते म्हणालेत.
हे वाचा - लॉकडाऊन 4.0 मध्ये मिळू शकते मोठी सूट, 11 राज्य करत आहेत प्लानिंग
श्रीनाथ रेड्डी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, "जी लोकं भारतात कोरोनाचा दुसरा टप्पा असल्याचं सांगत आहेत, ती लोकं बहुतेक प्रकरणं ही परदेशातून आलेली लोकं किंवा त्यांच्या संपर्कात आलेली आहेत. त्यामुळे हा स्थानिक प्रसार आहे की सामुदायिक प्रसार हे सांगता येऊ शकत नाही, असं म्हणालेत. आपण सामुदायिक प्रसारासारख्या शब्दांच्या वापरापासून वाचत आहोत. हा परिभाषा किंवा भाषेचा विषय आहे"
रेड्डी म्हणाले, "सामुदायिक प्रसार हा फक्त धोका नाही तर एक संकट आहे. या महासाथीचा प्रकोप झालेल्या देशांच्या तुलनेत दक्षिण पूर्व आशियातील देश विशेषत: भारतात प्रति लाख व्यक्तींमागे मृत्यूदर कमी आहेत. कमी वय असलेली सर्वाधिक लोकसंख्या, ग्रामीण भागात लोकसंख्येचं जास्त प्रमाण आणि लॉकडाऊनसारखी पावलं उचलणं हे भारतातील मृत्यूदर कमी असण्यामागील कारणं असू शकतात, असं ते म्हणालेत. मात्र ही स्थिती अशीच राहायला हवी यावर त्यांनी भर दिला. ते म्हणआले लॉकडाऊन खुलं झाल्यानंतर काही धोके वाढू शकतात. कारण लोकांची रहदारी वाढेल आणि व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यताही वाढेल"
हे वाचा - मुंबईत एका दिवसातल्या कोरोनाबळींचा उच्चांक; रुग्णसंख्याही गेली 17,512
"या जागतिक महासाथीनं जिथं भयंकर रूप घेतलं आहे, त्या देशात सामुदायिक प्रसार प्रत्यक्षात दिसून आला आहे आणि भारतानंही यासाठी तयार राहायला हवं. किंबहुना सामुदायिक प्रसार होतो आहे असं समजूनच काम करायला हवं आणि त्याला रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलायला हवीत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं आणि हात धुणं यासारख्या सवयींचं नियमित पालन करायला हवं. असा सल्ला रेड्डी यांनी दिला आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड