मुंबई, 15 मे : मुंबईत आज एकाच दिवसात कोरोनामुळें 34 जणांचा मृत्यू नोंदला गेला. इतके मृत्यू एका दिवसात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईत आज 933 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनाच्या एकूण रुग्णाची संख्या 17512 वर पोहचली आहे. आजवर मुंबईत एकूण 655 जणाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत विविध रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोरोनारुग्णांपैकी 24 जणांचा मृत्यू गेल्या 24 तासांत झाला आहे. पण मुंबई महापालिकेने आणखी 10 जणांचा मृत्यूही आज नोंदवला आहे. हे 10 रुग्ण 10 ते 12 मे दरम्यान मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण 34 रुग्णांचा Covid-19 ने मृत्यू नोंदवला गेला आहे. ही आतापर्यंतची एका दिवसातली सर्वात मोठी संख्या आहे. जवर मुंबईत एकूण 655 जणाचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 334 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 4468 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
933 fresh positive cases of #COVID19 and 24 deaths have been reported today in Mumbai, taking the total positive cases to 17512 and 655 respectively. 4658 patients have been discharged so far: Brihanmumbai Municipal Corporation #Maharashtra
मुंबईपाठोपाठ ठाण्यातही कोरोनाची धोका वाढला आहे. ठाण्यात आज तब्बल 83 करोना बाधित रुग्ण सापडले. आतापर्यंत ठाण्यात एकूण 996 करोना रुग्णांचं निदान झालं आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण 48 जणांचा ठाण्यात करोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 273 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, आज राज्यात 1576 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 29100 झाली आहे.