मराठी बातम्या /बातम्या /देश /

President Election 2022 Live: पक्षादेश झुगारून महाविकास आघाडीचे आमदार मुर्मूंना मतदान करतील: आशिष शेलार

President Election 2022 Live: पक्षादेश झुगारून महाविकास आघाडीचे आमदार मुर्मूंना मतदान करतील: आशिष शेलार

indian presidential election 2022

indian presidential election 2022

India president election 2022: भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी द्रौपदी मुर्मू विजयी होतील, असं म्हटलं आहे. भाजप-शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीचे आमदारही त्यांना मतदान करतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 18 जुलै: राष्ट्रपती निवडणुकीसाठी (President Election) आज देशभरात मतदान होणार आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार असून या निवडणूकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी द्रौपदी मुर्मू  विजयी होतील, असं म्हटलं आहे. भाजप-शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीचे आमदारही त्यांना मतदान करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. पक्षमर्यादा सोडून किंवा पक्षादेश झिडकारून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीचे आमदार मूर्मूंना मतदान करतील, आशिष शेलारांचा दावा-

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आज राष्ट्रपतीपदासाठी  निवडणूक होत आहे. बदललेल्या राजकीय गणितानंतर राष्ट्रपतिपदाच्या होणाऱ्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून भरघोस पाठिंबा मिळावा यासाठी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी खास रणनिती आखली आहे. याचाच एक भाग म्हणून काल भाजप शिवसेनेचे आमदार हॉटेल ट्रायडंटमध्ये उपस्थित होते. नुकत्याच विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावात शिंदे-फडणवीस सरकारला 165 मतं पडली होती. परंतु या बहुमतापेक्षा 30 ते 35 अधिक मते मिळवण्यासाठी भाजप-शिवसेना प्रयत्नशील आहे.

कोकणात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही काही तासातच सोडली साथ

 आपल्या मतांशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांची मते वळवण्याचा प्रयत्नही शिंदे-फडणवीस यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी मूर्मू यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप-शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीचे आमदारही त्यांना मतदान करतील, असं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत महाराष्ट्रातील आमदार पक्षमर्यादा सोडून मतदान करतील असं ते म्हणाले. पक्षादेश झिडकारून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मूर्मूंना महाराष्ट्रातून 200 मतं मिळणार?

दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विधानसभेचे सर्व आमदार आणि 48 खासदार मतदान करणार आहेत. सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे मिळून एकूण 165 आमदार आहेत. शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे 15 आमदार मिळून ही संख्या 180 पर्यंत पोहोचली आहे. आता महाराष्ट्रातून 200 मतांचा पल्ला गाठण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष्य आहे. हा पल्ला गाठण्यासाठी  आणखी 20 आमदारांची गरज असून आता त्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. याच पार्श्वभूमीवर पक्षादेश झिडकारून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे आमदार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Ashish shelar, BJP, Elections, President