जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोकणात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही काही तासातच सोडली साथ

कोकणात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही काही तासातच सोडली साथ

कोकणात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनीही काही तासातच सोडली साथ

आता कोकणातही उद्धव ठाकरेंना दणका बसला आहे. आता नवनियुक्त पदाधिकाऱ्यंनीही काही तासातच राजीनामे देत ठाकरेंना झटका दिला आहे.

  • -MIN READ Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी 18 जुलै : आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेतील गळती थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केलं. यादरम्यान शिवसेनेनं कधी भावनिक आवाहन करत तर कधी कायदेशीर लढा देत आमदारांना परत आणण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू केले. मात्र, अद्याप या प्रयत्नांना यश आलेलं नाही. आता शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे (Political Updates Maharashtra). ‘जनमत आपल्या विरोधात, विरोधी बाकावर बसू’, जितेंद्र आव्हाडांची फेसबुक पोस्ट चर्चेत शिवसेनेतील गळती थांबण्याऐवजी दिवसेंदिवस आणखीच वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. आता कोकणातही उद्धव ठाकरेंना दणका बसला आहे. आता नवनियुक्त पदाधिकाऱ्यंनीही काही तासातच राजीनामे देत ठाकरेंना झटका दिला आहे. यामुळे शिवसेनेपुढील पेच आणखीच वाढला आहे. दिवसेंदिवस उद्धव ठाकरेंकडील संख्याबळ कमी होताना दिसत आहे. अगदी ग्राऊंड लेव्हलचे कार्यकर्तेही आता एकनाथ शिंदेंना पाठिंबा देताना दिसत आहेत. रत्नागिरीतील जिल्हाप्रमुखांनी आता आपला पदभार स्विकारण्यास थेट नकार देत उद्धव ठाकरेंना झटका दिला आहे (Ratnagiri Shivsena). प्रकाश रसाळ यांनी कौटुंबिक आणि आरोग्याचं कारण देत ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिला आहे. याशिवाय रत्नागिरी तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनीही काही तासातच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. नवीन नियुक्ती होताच काही तासातच अनेकांनी राजीनामे दिल्याने शिवसेनेच्या अडचणी आणखीच वाढल्या आहेत. पुणे, कोल्हापूर…ठाकरेंना धक्क्यांवर धक्के; शिवसेनेला पडणार मोठं भगदाड? बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिवसैनिकांवर अन्याय झाल्याचा आरोप बंडखोरांनी केला आहे. त्यामुळे भाजपसोबतची नैसर्गिक युतीचं पुढे न्यावी, अशी मागणीही बंडखोरांनी केली आहे. मात्र, तरीही वारंवार भावनिक आवाहन करत उद्धव ठाकरेंनी आमदारांना परत बोलावण्याचा प्रयत्न केला. अद्याप तरी या प्रयत्नाला यश आलेलं दिसत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात