मराठी बातम्या /बातम्या /देश /G20 Summit: भारताला मोठं यश, शेतकरी आणि हवामान बदलासह या मुद्द्यांकडे वेधलं लक्ष

G20 Summit: भारताला मोठं यश, शेतकरी आणि हवामान बदलासह या मुद्द्यांकडे वेधलं लक्ष

G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी युरोपला रवाना होण्यापूर्वी पीएम मोदी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, ते ग्लासगो बैठकीत हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतील.

G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी युरोपला रवाना होण्यापूर्वी पीएम मोदी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, ते ग्लासगो बैठकीत हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतील.

G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी युरोपला रवाना होण्यापूर्वी पीएम मोदी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, ते ग्लासगो बैठकीत हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतील.

नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : इटलीची (Italy) राजधानी रोम (Rome) येथे सुरू असलेली G20 शिखर परिषद अनेक अर्थाने भारतासाठी अत्यंत यशस्वी ठरली आहे (India in G20 Summit). सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिखर परिषदेत इतर विकसनशील देशांसोबत हवामान आणि ऊर्जा विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत या मुद्द्यावर भाषेचे महत्त्व समजावून सांगण्यात भारत यशस्वी ठरला आहे. अहवालानुसार, G20 देशांना हवामान बदलाबाबत (Climate Change) त्यांच्या जबाबदाऱ्यांवर सक्रियपणे काम करण्यास सांगितलं गेलं.

सूत्रांनी सांगितलं की, जी-20 देशांचे लक्ष शेतकऱ्यांकडे वेधण्यातही भारत यशस्वी ठरला आहे. भारताने G20 देशांना G20 शिखर परिषदेच्या मंचावरून लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले, यासाठी सर्व देशांना वचनबद्ध केले आहे. यावेळी शिखर परिषदेत समूह देशांचे लक्ष अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

G-20 समिटमध्ये बायडेन आणि मॅक्रॉनसह दिग्गज नेत्यांना भेटले पंतप्रधान मोदी

या वर्षाच्या सुरुवातीला UN ची हवामान बदलावरील मुख्य देखरेख संस्था इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजने म्हटलं, की जागतिक तापमान वाढ पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित करण्यासाठी जगाने ताबडतोब असाधारण पावले उचलण्याची गरज आहे. त्यात असेही म्हटले आहे की पॅरिसमध्ये 2015 ची COP बैठक पुरेशी महत्त्वाकांक्षी नव्हती किंवा ती हवामान संकट दूर करण्यासाठी पुरेशी नव्हती. पॅरिसच्या बैठकीत, 190 देशांनी औद्योगिक पातळीपेक्षा 2 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमान वाढ मर्यादित करण्यासाठी काम करण्यास सहमती दर्शविली, मात्र आपल्या पर्यावरणासाठी सर्वोत्तम तापमान 1.5 डिग्री सेल्सियस होते.

सध्याच्या परिस्थितीनुसार उर्जेचे उत्सर्जन सुरू राहिल्यास या शतकाच्या अखेरीस ग्रहाचे तापमान २.७ अंश सेल्सिअसने वाढेल, असे समोर आले आहे. हे टाळण्यासाठी, IPCC ने म्हटले आहे की, 2050 च्या आसपास जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 'निव्वळ शून्य' पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अमेरिका, ब्रिटन सारख्या लोकांनी 2050 पर्यंत निव्वळ शून्य गाठण्यासाठी वचनबद्ध केले आहे, तर चीनने 2060 पर्यंत कार्बन न्यूट्रल होईल असे म्हटले आहे.

भारताच्या पहिल्या मतदाराचा दांडगा उत्साह! वयाच्या 104 व्या वर्षी केलं मतदान

G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी युरोपला रवाना होण्यापूर्वी पीएम मोदी यांनी एका निवेदनात म्हटले होते की, ते ग्लासगो बैठकीत हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतील. हवामान बदलाच्या मुद्द्यावर भारत 24 'सम-विचारी विकसनशील देश' (LMDCs) च्या गटाचा एक भाग आहे. या गटाच्या व्हर्च्युअल बैठकीदरम्यान, पीएम मोदींनी हवामान बदलाकडे जाण्यासाठी पूर्वी दिलेल्या आश्वासनांवर टीका केली.

पीएम मोदींनी बैठकीत सांगितलं की, आज भारत हवामान अनुकूलता, शमन आणि लवचिकता तसंच बहुपक्षीय युती तयार करण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. स्थापित अक्षय ऊर्जा, पवन आणि सौर उर्जा क्षमतेच्या बाबतीत भारत जगातील अव्वल देशांपैकी एक आहे.

First published:

Tags: Climate change, Pm narenda modi