एकीकडे देशातील मोठा वर्ग मतदानाकडे पाठ फिरवत असताना, या आजोबांनी मात्र सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले मतदार, 104 वर्षीय श्याम सरन नेगी यांनी शनिवारी हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील कल्पा या मतदान केंद्रावर मंडी लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान केले.