Home /News /national /

खरं आहे की खोटं: 15 जूननंतर देशभरात पुन्हा लागू होणार कडक लॉकडाऊन?

खरं आहे की खोटं: 15 जूननंतर देशभरात पुन्हा लागू होणार कडक लॉकडाऊन?

अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असून सरकारच्या वतीनं आता अनलॉक 1.0 ही सुरू करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 11 जून : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असून सरकारच्या वतीनं आता अनलॉक 1.0 ही सुरू करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर देशात 15 जूननंतर पूर्ण संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला जाणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये 15 जूननंतर गृह मंत्रालयाच्या वतीनं अनलॉक़ 1.0 हटवत पुन्हा कडक नियम लागू करण्यात येणार असल्याचं म्हंटलं आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज फेक असल्याचं फॅक्ट चेकमध्ये आढळून आले आहे. पीआयबीनं हा मेसेज फेक असून 15 जूननंतर लॉकडाऊन 6.0 बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. सध्या अनलॉक अंतर्गत हॉटेल, मॉल्स, बससेवा, धार्मिक स्थळांना परवानगी देण्यात आली आहे. वाचा-आधी कोरोना रुग्णांची सेवा, मग लग्न; तब्बल दीड महिन्यांनी कोरोना योद्धा विवाहबद्ध वाचा-बापरे! कोरोना व्हायरसमुळे जगात होऊ शकतो 10 कोटी लोकांचा मृत्यू याआधी सरकारच्या वतीनं 30 जूनपर्यंत कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान आता केवळ रेड झोन आणि कन्टेन्मेंट झोन असे केवळ दोन विभागणी करण्यात आली आहे. यात कन्टेन्मेंट झोनमध्ये तीन टप्प्यांमध्ये काही सवलती देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळं, हॉटेल, मॉल्स यांना परवानगी देण्यात आली. मात्र मॉल्स खुले करण्यात आले असले तरी, ग्राहकांना जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही आहे. वाचा-काँग्रेस नगरसेवकाने दिली मुलाच्या लग्नाची पार्टी, स्वयंपाकीच निघाला पॉझिटिव्ह सध्या दुसऱ्या टप्प्याचा विचार केला जात आहे. या टप्प्यात शाळा, कॉलेज, क्लासेस सुरू करण्यावर विचार केला जात आहे. 15 ऑगस्टनंतर सोशल डिस्टन्सिंग पाळून शाळा सुरू करण्याच्या विचारात सरकार आहे. यासाठी पालकांशी चर्चा केली जात आहे. तर तिसऱ्या टप्प्यात ट्रेन सुरू करण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान दुसरा आणि तिसरा टप्पा हा कोरोनाबाधितांच्या आकड्यांवर अवलंबून आहे. संचालन, संपादन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या