बापरे! कोरोना व्हायरसमुळे जगात होऊ शकतो 10 कोटी लोकांचा मृत्यू

बापरे! कोरोना व्हायरसमुळे जगात होऊ शकतो 10 कोटी लोकांचा मृत्यू

जगात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4 लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून 73 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाने ग्रासलं आहे.

  • Share this:

बीजिंग 11 जून: कोरोना व्हायरसमुळे सर्वच जगाला हादरा बसला आहे. जगातले 190 देश या व्हायरसमुळे ग्रासले आहेत. काही देशांनी व्हायरसवर नियंत्रण मिळवलेलं असलं तरी त्याचा धोका टळलेला नाही. जगात या व्हायरसमुळे तब्बल 10 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती जगप्रसिद्ध Lancet मासिकात आलेल्या एका संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. Active case finding with case management: The key to tackling the COVID-19 pandemic असं लांबलचक शिर्षक या लेखाचं असून चीनचे तत्ज्ञ डॉक्टर गाओ फू यांच्या नेतृत्वाखाली हा लेख तज्ज्ञ डॉक्टरांनी लिहिला आहे.

1918मध्ये आलेल्या महामारीत जगात कोट्यवधी लोकांचा बळी गेला होता. त्यापेक्षाही कोरोनाची साथ भयानक असल्याचं त्यात म्हटलं आहे. इतर साथीच्या आजारांपेक्षा कोरोनाचा आजार भयंकर आहे. त्याच बरोबर त्याचा मृत्यूदरही जास्त असल्याचं निरिक्षण यात नोंदविण्यात आलं आहे.

जगभरातले साथीचे रोग, त्याचे परिणाम, मत्यूची संख्या, त्यावरचं औषध, ते हाताळण्यासाठीचे प्रयोग अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि संशोधन करून हा शोध घेण्यात आला आहे.

यावर अजुन औषध मिळालेलं नसल्याने व्हायरस अधिक शक्तिशाली झाला आहे. त्यामुळे जास्त धोका आहे. अनेक देशांनी नियंत्रण मिळवलेलं असलं तरी धोका कायम असून चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरस डोकं वर काढू शकतो अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

जगात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4 लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून 73 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाने ग्रासलं आहे.

हे वाचा -

जुलै महिन्यात येणार ‘COVID-19’वर औषध? Johnson & Johnson करणार माणसांवर प्रयोग

कोरोनाच्या संकटात जगातील 'हे' 10 देश सर्वाधिक सुरक्षित; पाहा भारत कितव्या स्थानी

दिलासादायक! 'या' शहरात विकसित होतेय कोरोनाविरोधात हर्ड इम्युनिटी

संकलन - अजय कौटिकवार

 

 

 

First published: June 11, 2020, 7:03 AM IST

ताज्या बातम्या