निलेश पवार, नंदुरबार 10 जून: नंदुरबारमधल्या काँग्रेस नगरसेवकाने आपल्या मुलाच्या लग्ना प्रित्यर्थ दिलेली जंगी पार्टी चौकशीच्या फेऱ्यात अडकली असुन या पार्टीतील खानसामाच कोरोना बाधित निघाला आहे. हे प्रकरण समोर आल्याने पार्टीला उपस्थिती लावणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांसह अनेक अधिकारी आणि प्रतिष्ठीत संशयाच्या जाळ्यात अडकले आहेत. नंदुरबारचे काँग्रेस नगरसेवक खान परवेज करामतभाई यांनी ही पार्टी रविवारी दिली होती.
करामतभाई यांनी जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या फार्म हाऊसवर आपल्या मुलाच्या लग्नाच्या आनंदान पार्टीचे आयोजन केले होते. मात्र या पार्टीतील खानसमाच कोरोना बाधित निघाल्याने या आनंदानावर विर्जन पडले. त्यामुळे ही पार्टी चौकशीच्या भोवऱ्यात सापडली आहे.
विशेष म्हणजे नियमांचं उल्लंघन करत या नेत्याच्या पार्टीला तीनशेहुन अधिक पुढारी, अधिकारी आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे या नेत्याच्या पार्टीच्या आयोजनानंतर भाजपाला आयतं कोलीत हाती लागलं असुन जिल्हा भाजपाने या पार्टी आयोजन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
जुलै महिन्यात येणार ‘COVID-19’वर औषध? Johnson & Johnson करणार माणसांवर प्रयोग
तर संबधीत नगरसेवकाने हा कार्यक्रम परवानगी घेवून केल्याचे पत्रक काढत यात पन्नासहुनही कमी लोकांनी हजेरी लावल्याचा दावा केलाय. संबंधित कोरोनाबाधित व्यक्ती हा आचारी असला तरी त्याने स्वयंपाक केलेला नव्हती तर दुसऱ्याच आचाऱ्याने स्वयंपाक तयार केल्याचा दावा केलाय. पॉझिटिव्ह व्यक्ती ही नातेवाईक असल्याचे त्यांनी मान्य केलं आहे.
समुद्राशी नागपुरचा काही संबंध नाही, फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल, पवारांचा टोला
मात्र या पार्टीला सर्वच पक्षातील बडेनेते सामील झाल्याची चर्चा जोर धरु लागल्याने कारवाई होणार की नाही याबाबत देखील साशंकता व्यक्त होत आहे. आरोप-प्रत्यारोप होत असल्याने प्रशासन आता जागे झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तीन सदस्यीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या प्रकरणानंतर आता नंदुरबार मधील राजकारण देखील तापले आहे.