नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: संपूर्ण जग कोरोना व्हायरस (Corona Virus) या महामारीचा सामना करत आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लस खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जगभरात कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. अशातच भारत देशातील कोरोना व्हायरसचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण (Vaccination) मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 64 लाखांहून अधिक (64,98,274) लसीचे डोस देण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आतापर्यंत 83 कोटीहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 82.65 कोटींपेक्षा अधिक मात्रा (82,65,15,754 ) देण्यात आल्या आहेत. एकूण 81,05,030 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण मोहिमेचा नियमितपणे आढावा घेतला जा असून देशातील सर्वात असुरक्षित असलेल्या घटकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांचे निरीक्षण केलं जातं आहे. 16 जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीमेला सुरू करण्यात आली, ज्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्याचं (HCW) लसीकरण करण्यात आले. फ्रंटलाइन वर्कर्स (FLW) चे लसीकरण 2 फेब्रुवारीला सुरू झाले. केंद्र सरकार देशभरात कोविड -19 लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि लोकांना लसीकरण करण्याच्या गतीला आणखी वेग देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. कोरोनाची लस सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी 21 जून 2021 पासून नवीन टप्पा सुरू करण्यात आला होता.
सध्या 4.52 कोटीहून अधिक लसीचे डोस राज्यांकडे उपलब्ध केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे 80.13 कोटी (80,13,26,335) डोस मोफत आणि इतर माध्यमांद्वारे प्रदान केले आहेत. यासह 48 लाख (48,00,000) पेक्षा जास्त लस पाठवण्याची तयारी करत आहे. सध्या कोविड -19 लसीचे 4.52 कोटींपेक्षा जास्त (4,52,07,660) अतिरिक्त आणि न वापरलेले डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत, जे प्रशासित करायचे आहेत. अधिकाधिक लसींच्या उपलब्धतेद्वारे लसीकरण मोहिमेची गती वाढवण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. याअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या उपलब्धतेविषयी अगोदर माहिती दिली जाते, जेणेकरून ते लसींसाठी अधिक चांगले नियोजन करू शकतील आणि लस पुरवठा साखळी सुधारू शकतील, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
Aadhaar Data Base वर चीनचा सायबर हल्ला? अमेरिकेतल्या एजन्सीने दिली माहिती
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोविड लस देऊन त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे. लस उपलब्धतेच्या नवीन टप्प्यात, 75 टक्के लस केंद्र सरकारकडून लस उत्पादकांकडून खरेदी केली जात आहेत आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत दिली जात आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
देशातील कोरोना लसीकरणासंदर्भातले महत्त्वाचे मुद्दे भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत 82.65 कोटीहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या. भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.77% गेल्या 24 तासात कोरोनाच्या 26,964 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,01,989) , असून ती आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 0.90 % साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.08%) गेले 89 दिवस हा दर 3% पेक्षा कमी