• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • IBM Recruitment: नामांकित Tech कंपनी IBM देशातील फ्रेशर्सना देणार नोकरी; 'या' पदांसाठी करू शकता अप्लाय

IBM Recruitment: नामांकित Tech कंपनी IBM देशातील फ्रेशर्सना देणार नोकरी; 'या' पदांसाठी करू शकता अप्लाय

भारतातील काही शहरांमध्ये फ्रेशर्स ग्रॅज्युएट्सना नोकरीची (IBM Recruitment for freshers in India) संधी देणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: कोरोनाच्या काळात झालेल्या भरघोस फायद्यानंतर आता जगभरातील नामांकित IT कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पदभरती (Latest IT company jobs) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आहे त्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नामांकित Tech कंपनी International Business Machines म्हणजेच IBM (IBM recruitment India) लवकरच भारतातील काही शहरांमध्ये फ्रेशर्स ग्रॅज्युएट्सना नोकरीची (IBM Recruitment for freshers in India) संधी देणार आहे. IBM ही कंपनी देशभरातील काही शहरांमधील फ्रेशर्सना नोकरी (IBM Freshers Jobs) देणार आहे. या पदभरती दरम्यान उमेदवारांना असोसिएट सिस्टम इंजिनिअर (Associate System Engineer) हे पद देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना Java, Python, Node.js आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार विविध प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानामध्ये अनुप्रयोगांची रचना करेल, कोड लिहील, चाचणी करेल, डीबग करेल आणि सॉफ्टवेअर अनुप्रयोगांची देखभाल करेल. IBM मधील या पदभरतीसाठी मुंबई, पुणे, दिल्ली/ एनसीआर, गुडगाव, नोएडा, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, अहमदाबाद या शहरांमधील काही फ्रेशर्सना संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडे काही गुण असणं आवश्यक आहे. हे वाचा -  WFH, Cab सर्व्हिस, नाश्ता; ऑफिसमध्ये परतण्यासाठी कंपन्या देताहेत 'या' ऑफर्स हे गुण असणं आवश्यक आवश्यक प्लॅटफॉर्मवर तांत्रिक आर्किटेक्चर परिभाषित करणे, Analysis करणे आणि Review करणे आणि आर्किटेक्चर options आणि recommendation देणे हे गुण असणं आवश्यक. आयटी आर्किटेक्चरशी संबंधित एंटरप्राइज समस्यांच ज्ञान असणं. कामाशी निगडित टेक्निकल गरज पूर्ण करणे. कम्युनिकेशन स्किल्स चांगले असणं आवश्यक. पात्रतेचे निकष हा जॉब फ्रेशर्ससाठी असल्यामुळे उमेदवार हे त्यांच्या शिक्षणाच्या फायनल इयरला असणं आवश्यक आहे. तसंच IBM मध्ये काम सुरु  करण्याच्या आधी उमेदवारांकडे डिग्री असणं आवश्यक आहे. BE/ MTech/ MSc/ MCA in CS/ IT/ यामध्ये उमेदवारांना 6 CGPA असणं आवश्यक आहे. या पदभरतीसाठी अप्लाय  करण्यासाठी उमेदवारांना IBM च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जाबद्दल माहिती घेता येणार आहे. हे वाचा - TCS Work from Home: काही कर्मचाऱ्यांना भविष्यात ऑफिस जाण्याची गरज पडणार नाही अमेझॉन भारतात देणार 10 लाख नोकऱ्या बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन (Amazon) यावर्षी भारतात ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. देशातील ३५ शहरांमध्ये कॉर्पोरेट, टेक्नॉलॉजी, कस्टमर केअर सर्व्हिस आणि ऑपरेशन क्षेत्रात नोकरभरती होईल. यात मुंबई, पुणे बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, गुरूग्राम, कोलकाता, नोएडा, अमृतसर, अहमदाबाद, भोपाळ, जयपूर, कानपूर, कोईमतूर, लुधियाना, सुरत या शहरांचा समावेश आहे. 'न्यूज १८'च्या वृत्तानुसार २०२५ पर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अमेझॉन तब्बल १० लाख नोकऱ्या भारतात उपलब्ध करून देणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published: