मराठी बातम्या /बातम्या /देश /चीनच्या कुरापती सुरुच! भारत-चीनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक; समोर आली मोठी माहिती

चीनच्या कुरापती सुरुच! भारत-चीनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक; समोर आली मोठी माहिती

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना 9 डिसेंबरची आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना 9 डिसेंबरची आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना 9 डिसेंबरची आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 13 डिसेंबर : अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाल्याचं समोर आलं आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंचे अनेक सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना 9 डिसेंबरची आहे.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत भारतीय लष्कराचे किमान 20 जवान जखमी झाले आहेत. त्याचबरोबर चिनी सैन्याचंही मोठं नुकसान झालं आहे. जखमी जवानांवर गुवाहाटी येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घडामोडींमुळे भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे.

'इन्शाअल्लाह पाकिस्तानच्या संसदेवर तिरंगा फडकवणार' कोण आहे प्रो. शेख सादिक?

गेल्या शुक्रवारी म्हणजेच 9 डिसेंबरला चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. यावेळी झालेल्या संघर्षात दोन्ही देशांचे काही जवान जखमी झाले आहेत. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून आणखी रक्तरंजित होऊ शकणारा संघर्ष रोखला.

दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये दगडफेकही झाली. यावेळी दोन्ही बाजूचे सैनिक किरकोळ जखमी झाले. रिपोर्टनुसार, पहिली चकमक ९ डिसेंबरला झाली होती. यानंतर 11 डिसेंबरलाही चकमक झाली होती. भारतीय लष्कर आणि पीएलए जवानांमध्ये झालेल्या चकमकानंतर दोन्ही देशांदरम्यान बैठकही झाल्याचं वृत्त आहे. मात्र, चकमक झाल्यानंतर दोन्ही बाजूचे सैनिक मागे हटले.

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; नदीप्रमाणे वाहतोय तप्त लाव्हा, पुलही वितळले, भीषणता दाखवणारा VIDEO

यापूर्वी डोकलाममध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली होती. याआधी पूर्व लडाखमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.

अरुणाचल प्रदेशात, तवांग सेक्टरमधील LAC च्या बाजूने काही भागात दोन्ही देशांची आपापली धारणा आहे. या भागात दोन्ही बाजू आपापल्या हक्काच्या परिसरात गस्त घालतात. 2006 पासून हा ट्रेंड आहे. अशा परिस्थितीत या भागातील क्षेत्राबाबत दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती कायम असते.

First published:

Tags: India china