नवी दिल्ली, 5 डिसेंबर : पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असीम मुनीर अहमद यांनी नुकतीच आपली जबाबदारी स्वीकारली आहे. इतर लष्करप्रमुखांप्रमाणेच असीम मुनीर यांनीही पदभार स्वीकारताच काश्मीर ताब्यात घेण्याचा सूर लावला. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, पाकिस्तानचे सैन्य शत्रूंना चोख प्रत्युत्तर देत राहील. त्यांच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर दोन्ही देशातील जनतेमध्ये युद्धाचे वातावरण निर्माण झाले होते.
स्वीडनच्या उप्पसाला विद्यापीठातील पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिसर्चचे प्राध्यापक अशोक स्वेन यांनी ट्विट केले की, भारतीय लष्कराच्या जनरलच्या मते, ते पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत घेऊ शकतात. त्याचवेळी पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख काश्मीरचा काही भाग भारताच्या ताब्यातून घेणार असल्याचे सांगत आहेत. या सगळ्यात सामान्य काश्मिरींना कधी कुणी विचारलं आहे की त्यांना काय हवंय? यानंतर काश्मीरबाबत ट्विटरवरील युजर्समध्ये युद्ध सुरू झाले.
'काश्मिरींना पाकिस्तानसोबत नाही तर भारतासोबत राहायचे आहे'
पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी अभिनेता, You Tuber, सहर शिनवारी याने ट्विट केले की, पेशावर ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण पाकिस्तान असता तर किती मजा आली असती. याला विरोध करताना टिपू सुलतान पक्षाचे संस्थापक प्राध्यापक शेख सादिक यांनी लिहिले की, "स्वप्न पाहणे बंद करा. इन्शाअल्लाह एक दिवस असा येईल जेव्हा आम्ही पाकिस्तानच्या संसदेवर तिरंगा फडकावू." प्रोफेसर अशोक स्वेन यांच्या ट्विटला एका यूजरने उत्तर दिले की काश्मिरींनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.
वाचा - जगातील सर्वात प्रदूषित देशांमध्ये भारताचे दोन शेजारी; आपला नंबर कितवा?
'काश्मीर ताब्यात घेण्याचा पाकचा अयशस्वी प्रयत्न'
सिंधुदेशच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अशोक स्वेन यांना उत्तर देण्यात आले की सामान्य काश्मिरींची इच्छा आधीच डॉक्यूमेंटेड आहे. फक्त पाकिस्तान आणि तेथील जनता ते मान्य करायला तयार नाही. त्यात पुढे लिहिले आहे की, 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू-काश्मीरच्या लोकांची इच्छा कागदपत्रांमध्ये नोंदवण्यात आली आहे. हे दस्तऐवज जम्मू आणि काश्मीरचे महाराजा हरी सिंह यांनी स्वाक्षरी केलेले भारतातील प्रवेशाचे कागदपत्र आहेत. त्यानंतरही 1947 पासून आजतागायत पाकिस्तान काश्मीर ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे.
'हिंदू हेच खरे काश्मिरी तरी काश्मीरबाहेर'
खुर्रम सईद या ट्विटर युजरने प्रश्न उपस्थित केला की, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात एकाही नेत्याने हा फालतू वाद का सोडवला नाही? त्याशिवाय, आमच्याकडे हे विषारी लोक आहेत जे आग लावत आहेत आणि स्वतः आनंद घेत आहेत. पाकिस्तानी काश्मीरला पाकिस्तानचा भाग का मानतात हे मला समजले नाही. त्याचवेळी, सिंपली हितेश या यूजरने लिहिले की, काश्मिरी काश्मीरबाहेर आहेत. काश्मिरी हिंदू हेच खरे काश्मिरी आहेत. जम्मू आणि लडाखचे लोकही खरे काश्मिरी आहेत. हे लोक लढले, शोषित झाले पण कधीही झुकले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan, Pakistan army