नवी दिल्ली, 16 जून : मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची (Stock Market Live Update) सुरुवात तेजीने झाली. मात्र आता भारत आणि चीनमधील तणाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर प्रमुख बेंचमार्क इंडेक्स सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसईच्या 30 शेअर्सचे प्रमुख बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स वरील स्तरापासून 600 अंकानी घसरून 33,241 च्या पातळीवर आला आहे. एनएसईच्या 50 शेअर्सचे प्रमुख इंडेक्स निफ्टी मध्ये वरील स्तरापासून 200 अंकांनी घसरण झाली आहे. मंगळवारी सेन्सेक्स 624.92 अंक वर तर निफ्टी 201.1 अंकांच्या वाढीसह बाजार सुरू झाला. त्यानंतर पुन्हा सेन्सेक्स 793.21 आणि निफ्टी 232.45 अंकांपर्यंत वाढला होता.
कोट्यवधी रुपये बुडाले
एसकोर्ट सिक्युरिटी रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी न्यूज 18 हिंदीशी बोलतना अशी माहिती दिली की, भारत आणि चीनमध्ये तणाव वाढल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. ज्याठिकाणी सकाळी गुंतवणुकदारांना शेअर बाजारात मोठा फायदा मिळत होता. तेच या बातमीमुळे काही मिनीटांमध्ये गुंतवणूकदारांचे 34 हजार कोटी रुपये बुडाले आहेत.
वाचा-भारत- चीन तणावाबद्दल मोदींना माहिती; संरक्षण मंत्रीही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीलासेन्सेक्स 200 अंकानी तर निफ्टी 60 अंकानी उतरला
बीएसईच्या (BSE) 30 शेअर्सचे प्रमुख बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स सध्या (दुपारी 1.40) 200 अंंकानी घसरून 33,086 च्या स्तरावर आला आहे. आणि एनएसईच्या (NSE) 50 शेअर्सचे बेंचमार्क निफ्टी 60 अंकांनी घसरून 9753 या स्तरावर आहेत.
वाचा-लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय-चिनी सैन्यात चकमक, कर्नलसह दोन जवान शहीद45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर हिंसाचार
सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी झालेल्या वादातून भारताचे 3 जवान शहीद झाले. दोन्ही देशांमधील सैन्यात तुफान दगडफेक आणि मारहाण झाल्यानं तणावाचं वातावरण आहे. अशी परिस्थिती भारत-चीन सीमेवर 45 वर्षांनी म्हणजेच 1975 नंतर तयार झाली आहे जेव्हा भारताचे सैनिक शहीद झाले आहेत. यावेळी सैनिकांमध्ये गोळीबार नाही तर दगडफेक झाली. ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या 5 सैनिकांचा या वादात मृत्यू झाला आहे. भारतीय जवानांनी लडाखमधील सीमारेषा ओल्यांडल्याचा आरोप चीनच्या विदेश मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. त्यातून निर्माण झालेल्या वादातून हा हिंसाचार घडला असून यामध्ये चीनचेही सैनिक मृत्युमुखी पडले आहेत.
वाचा-45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर हिंसाचार, चीनची पहिली प्रतिक्रिया
संपादन-जान्हवी भाटकर
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.