नवी दिल्ली, 16 जून : भारत आणि चीन (India-China) दरम्यान लडाख सीमेवर अचानक तणाव वाढला आणि चकमकीत आपल्या बाजूचे दोन जवान आणि कर्नल शहीद झाले. पूर्व लडाख (Eastern Ladakh) जवळच्या सीमा रेषेवर गेल्या महिनाभरापासून संघर्ष सुरू आहे. पण त्यावर चर्चेअंती सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही काल रात्री दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये तुंबळ चकमक झाली. या सगळ्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे. आज ते सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हर्च्युअल मीटिंग करणार होते. आता या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील सहभागी होणार असल्याचं समजतं. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान मोदींची बैठक आधीच ठरलेली होती. 3 वाजता ही व्हर्च्युअल मीटिंग होणार आहे.
आता चीनबरोबरच्या सीमेवर अचानक तणाव वाढल्याने या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला संरक्षण मंत्री देखील हजर राहतील, अशी शक्यता आहे. लडाख सीमेजवळ गलवान खरं तर दोन्ही बाजूंकडून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होती. पण या दरम्यान सोमवारी रात्री दोन्ही सैन्यात चकमक झाली. दोन्ही बाजूचे वरिष्ठ अधिकारी सध्या भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत. भारत आणि चीनचे वरीष्ठ लष्करी अधिकारी गलवान खोऱ्यात भडकलेलं वातावरण शांत करण्याच्या दृष्टीने चर्चा करत आहेत. चीनच्या बाजूचेही 5 सैनिक मृत्युमुखी पडल्याची बातमी ग्लोबल टाईम्सने दिली आहे. 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर हिंसाचार, चीनची पहिली प्रतिक्रिया आता लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा संपल्यावर अधिकृत माहिती हाती येण्याची शक्यता आहे.
दोन्ही देशांचे मेजर जनरल स्तरावरचे अधिकारी लडाख आणि सीमेवरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चर्चा करत आहेत, असं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं. पाककडून भारतीय दूतावासातील 2 अधिकाऱ्यांचा छळ, हात-पाय बांधून मारहाण