मराठी बातम्या /बातम्या /देश /

Indian Army Day: ...आणि तेव्हा ब्रिटिशांनी भारताकडे सोपवली लष्कराची सर्व सूत्र, असा आहे अभिमानास्पद इतिहास

Indian Army Day: ...आणि तेव्हा ब्रिटिशांनी भारताकडे सोपवली लष्कराची सर्व सूत्र, असा आहे अभिमानास्पद इतिहास

15 जानेवारी 2021 आज आपण 74वा राष्ट्रीय लष्कर दिन साजरा करत आहोत. भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला, पण 1949 मध्ये ब्रिटिश लष्कराने लष्कराची सर्व सूत्रं भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवली.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 15 जानेवारी : हिमालयातील गोठवणाऱ्या थंडीत, राजस्थानच्या उन्हातील वाळवंटात, गुजरातपासून ते पश्चिम बंगालपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांचं 24 तास डोळ्यांत तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजेच, राष्ट्रीय लष्कर दिवस (Indian Army Day) आहे. 15 जानेवारी 2021 आज आपण 74वा राष्ट्रीय लष्कर दिन साजरा करत आहोत. याच दिवशी लष्करी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या तसंच अतुलनीय शौर्य दाखवलेल्या जवानांना गॅलेंटरी आणि सेना पदक देऊन गौरवण्यात येतं.

लष्करदिनानिमित्त देशभर संचलनं आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दिल्ली कँटोन्मेंटमध्ये (Delhi Cantonment) असलेल्या करिअप्पा परेड ग्राउंडवर लष्करदिनाचं मुख्य संचलन होतं. या वेळी लष्करातील विविध शस्रास्र, रनगाडे, टेहळणी यंत्रणा यांचं सादरीकरण केलं जातं. गेल्यावर्षी कॅप्टन तानिया शेरगिलने (Tania Shergill) लष्करदिनाच्या संचलनाचं नेतृत्व केलं होतं. ही जबाबदारी सांभाळणारी ती पहिली महिला ऑफिसर ठरली होती.

(वाचा - WhatsApp अकाउंट डिलीट केल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत धोका; लीक होऊ शकतं चॅट)

राष्ट्रीय लष्कर दिनाचा इतिहास

भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला, पण 1949 मध्ये ब्रिटिश लष्कराने लष्कराची सर्व सूत्रं भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवली. शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर (Francis Butcher) यांच्याकडून लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी 15 जानेवारी 1949 ला भारतील लष्कराची सूत्रं स्वीकारली. ले.जनरल करिअप्पा हे स्वतंत्र भारताच्या लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ होते.

कोडनदेरा ‘किप्पर’मदप्पा करिअप्पा यांना के. एम. करिअप्पा (KM Carriappa) या नावाने ओळखतात. 1947 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात पश्चिमेच्या आघाडीवर करिअप्पा यांनी भारतील लष्कराचं नेतृत्व केलं होतं. भारतात दोघांना फील्ड मार्शल ऑफ इंडिया ही मानाची पदवी मिळाली आहे त्यापैकी एक करिअप्पा आहेत. तर, सॅम माणकेशॉ (Sam Manekshaw) हे दुसरे फील्ड मार्शल ऑफ इंडिया पदवी मिळवणारे ठरले आहेत.

(वाचा - 20 महिन्यांची चिमुकली जग सोडून जाण्याआधी वाचवून गेली 5 लोकांचा जीव)

युनायटेड किंग्डममधील किंबर्लीमध्ये असलेल्या इंपिरियल डिफेन्स कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या पहिल्या दोन भारतीयांपैकी करिअप्पा एक होते. करिअप्पा मूळचे कर्नाटकातील होते. भारतीय लष्कराचे कमांडर-इन-चीफ होण्यापूर्वी करिअप्पा यांनी लष्कराच्या पूर्व आणि पश्चिम विभागाचं नेतृत्व केलं होतं.

First published:

Tags: Indian army