Home /News /national /

आता भारतात कोरोना रुग्णांना दिलं जाणार अमेरिकेचं औषध

आता भारतात कोरोना रुग्णांना दिलं जाणार अमेरिकेचं औषध

गंभीर कोरोना रुग्णांवर आपत्कालीन उपचारासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 03 जून : कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) प्रभावी अशी लस (vaccine) अद्याप नाही किंवा औषध (medicine) नाही. सध्या इतर आजारांवर जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांचं कोरोना रुग्णांवर ट्रायल सुरू आहे. अशाच औषधांपैकी एक असलेल्या रेमडेसिवीर (Remdesivir) औषधामुळे कोरोना रुग्णांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता भारतात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन वापरासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने  (Drugs Controller General of India) ही मंजुरी दिली आहे. अमेरिकेतल्या गिलियड सायन्स (Gilead Sciences) कंपनीचं हे औषध आहे. एबोलासाठी हे औषध तयार करण्यात आलं, जे आता कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अमेरिकेनंतर आता भारतातही हे औषध वापरलं जाणार आहे. हे वाचा - देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख पार, तरी ICMRकडून आली दिलासादायक बातमी रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, "गंभीर कोरोना रुग्णांवर आप्ताकालीन वापरासाठी या औषधाला 1 जूनला परवानगी देण्यात आली आहे", असं ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ई-मेलमध्ये सांगितलं. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाचे कन्फर्म किंवा संशयित रुग्णांनाही हे औषध दिलं जाणार आहे. यामध्ये प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सामान्यपणे रुग्णांना दहा दिवस हे औषध दिलं जातं मात्र भारतात फक्त 5 दिवस या औषधाचा डोस मर्यादित ठेवण्यात आला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख पार सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला भारत हा जगातील सातवा देश आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन आणि इटली या देशांनी 2 लाखांचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे देशात दररोज सरासरी 8 हजार नवीन प्रकरणे नोंदविली जात आहेत आणि जवळपास 300 लोकांचा मृत्यू होत आहे. हे वाचा - लॉकडाउन 5.0 लागू झाल्यानंतर पुण्यातून कोरोनाची आली धक्कादायक बातमी दरम्यान, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) म्हटले की कोरोना व्हायरस पीक सीझन (Peak) देशात येण्यासाठी अद्याप बराच काळ आहे. भारताचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आनंदाची बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे.भारतात आतापर्यंत 2 लाखांमधील 95 हजार 852 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट हा जवळजवळ 50% आहे. याचा अर्थ प्रत्येक 100 रुग्णांमधील 48 रुग्ण भारतात निरोगी होत आहेत. हे वाचा - हजार रुपयांचं औषध दीड लाखाला; अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांचे धक्कादायक अनुभव
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या