नवी दिल्ली, 03 जून : भारतात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) कहर सुरूच आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाखांवर गेला आहे. सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला भारत हा जगातील सातवा देश आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन आणि इटली या देशांनी 2 लाखांचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे देशात दररोज सरासरी 8 हजार नवीन प्रकरणे नोंदविली जात आहेत आणि जवळपास 300 लोकांचा मृत्यू होत आहे. दरम्यान, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) म्हटले की कोरोना व्हायरस पीक सीझन (Peak) देशात येण्यासाठी अद्याप बराच काळ आहे.
कोरोनच्या प्रकरणांमध्ये रोज 8000 हजार नवीन रुग्णांची नोंद होती. यावरून भारतात कोरोनाचा पीक सीझन आल्याचे मानले जात होते. मात्र ICMRच्या संशोधक डॉ. निवेदिता गुप्ता यांच्या मते, भारत कोरोनाच्या पीकपासून खूप दूर आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आमचे प्रयत्न आणि सरकारने घेतलेले निर्णय खूप प्रभावी असल्याचं सिद्ध होत आहे. हेच कारण आहे की इतर देशांपेक्षा आपली परिस्थिती बर्यापैकी चांगली आहे.
वाचा-पुणे ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र नेमकी कोणती आहेत? जाणून घ्याजून आणि जुलैमध्ये वाढणार आकडा
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही सांगितले की, जून किंवा जुलैमध्ये भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होईल. गुलेरिया म्हणाले की, 'कोव्हिड-19 ची प्रकरणं भारतात कधी वाढतील, याचे उत्तर मॉडेलिंगच्या आकडेवारीवर अवलंबून असेल. दोन्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ डेटाचे विश्लेषण करीत आहेत. त्यांच्यापैकी बर्याच जणांचा असा अंदाज आहे की जून किंवा जुलैमध्ये भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होईल. दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा एखादा संसर्गजन्य रोग पीकवर पोहोचतो तेव्हा याचा अर्थ असा होऊ शकत नाही की त्याचा उद्रेक संपला आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वात वाईट परिस्थिती संपली आहे.
वाचा-चीनमधील कोरोना रुग्णांच्या लक्षणांमध्ये बदल, 1 कोटी नागरिकांची केली तपासणीभारताचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त
आनंदाची बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे.भारतात आतापर्यंत 2 लाखांमधील 95 हजार 852 रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट हा जवळजवळ 50% आहे. याचा अर्थ प्रत्येक 100 रुग्णांमधील 48 रुग्ण भारतात निरोगी होत आहेत.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.