लॉकडाउन 5.0 लागू झाल्यानंतर पुण्यातून कोरोनाची धक्कादायक बातमी, एकाच दिवसात 22 बळी

लॉकडाउन 5.0 लागू झाल्यानंतर पुण्यातून कोरोनाची धक्कादायक बातमी, एकाच दिवसात 22 बळी

पुण्यात याआधी एका दिवसातील बळींचा उच्चांक हा 14 होता पण 2 जून रोजी मात्र तब्बल 22 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

  • Share this:

 पुणे, 03 जून : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 22 कोरोनाग्रस्त रुग्णांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे, यात निम्म्या महिला रूग्णांचा समावेश आहे. सर्व वयोगटातील हे रूग्ण असून, यापैकी काहींना उच्च रक्तदाब तर काहींना फुफ्फूसाचे विकार होते.

पुण्यात याआधी एका दिवसातील बळींचा उच्चांक हा 14 होता पण 2 जून रोजी मात्र तब्बल 22 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे प्रशासनही हादरून गेले आहे. एकाच दिवसातील एवढ्या उच्चांकी बळींमुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 367 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकट्या पुणे शहरातील मृतांची संख्या 345च्यावर गेली आहे.

हेही वाचा -निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात कुठे आणि कधी धडकणार? पाहा हवामानाचा LIVE VIDEO

पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 308 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहे. त्यामुळे एकट्या पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेसहा हजाराच्या पुढे गेला आहे. तर पुणे जिल्ह्यातील हीच आकडेवारी 8134वर पोहोचली आहे. दरम्यान, पुणे शहरात आज एकूण 192 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे शहरातील बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 4931 वर पोहोचली आहे. मात्र, सध्याही पुणे शहरातील विविध रुग्णालयातून 2846  कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

दरम्यान, लॉकडाउन 5 ला सुरुवात झाल्यानंतर आता विविध टप्प्यांमध्ये नियम बदलून आणखी शिथिलता आणण्यात येत आहे. पुण्यातही बुधवारपासून काही नियम बदलले जाणार असून त्यासंबंधीचे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये दुकानं कधी आणि कोणत्या भागातील उघडी असतील, तसंच प्रतिबंधित क्षेत्र अशा मुद्द्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा -पुणे ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र नेमकी कोणती आहेत? जाणून घ्या

नवीन आदेशात 65 ऐवजी 66 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत. मात्र, असं असलं तरीही अनेक वस्त्या कोरोनामुक्त ही झाल्या आहेत. 3 जून अर्थात बुधवारपासून पुण्यात उद्याने पहाटे 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. महापालिका नवीन आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व दुकाने सुरू राहतील. 8 जूनपासून 10 टक्के मनुष्यबळासह खासगी कार्यालये उघडणार आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: June 3, 2020, 9:45 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading