Home /News /videsh /

हजार रुपयांचं औषध दीड लाखाला; अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांनी व्यक्त केले भयावह अनुभव

हजार रुपयांचं औषध दीड लाखाला; अमेरिकेत अडकलेल्या भारतीयांनी व्यक्त केले भयावह अनुभव

अमेरिकेत वैद्यकीय सेवा खूप महाग आहे. अमेरिकेत पुतणीला भेटायला गेलेल्या या कुटुंबाचा अनुभव धक्कादायक आहे

    नवी दिल्ली, 3 जून : कोरोना व्हायरस असो की लॉकडाऊन, प्रत्येकाला या दिवसात अनेक चांगले वाईट अनुभव आले आहेत. पर्यावरणतज्ज्ञ डॉ दिनेश मिश्रा आणि त्याचा मोठा भाऊ अशा कटू अनुभवातून गेले आहे. हे लोक अमेरिकेत (एरिका) कॅलिफोर्नियामधील डब्लिनमध्ये अडकले आहेत. हे एकूण चार जण आहेत आणि सर्वजण कोणत्या ना कोणत्या आजारावरील औषधं खात आहेत. पण गेल्या तीन महिन्यांपासून यांना औषधं मिळण अवघड झालं आहे. अमेरिकेत डॉक्टरांकडे औषध घेण्यासाठी संपर्क साधला असता त्या डॉक्टरांनी 37 हजार रुपये फी मागितली. आणि हजार रुपयांमध्ये येणाऱ्या भारतीय औषधासाठी दीड लाख रुपयांचे बिल केले. देशात परतण्यासाठी या कुटुंबाकडे एअर लाइन्स (एअरलाइन्स) चे तिकीट आहे, परंतु विमान केव्हा उड्डाण करेल हे माहिती नाही. न्यूज 18 शी झालेल्या संवादात स्वत: दिनेश मिश्रा यांनी आपले अनुभव सांगितले. 27 मार्च रोजी परतणार होते मात्र 24 पासून फ्लाइट थांबविण्यात आली 22 फेब्रुवारीला आम्ही चार जण कोलकातामार्गे सिंगापूर एअरलाइन्सने अमेरिकेत आले. तेव्हापासून कॅलिफोर्नियाच्या डब्लिनमध्ये वास्तव्य करीत आहे. आमचे रिटर्न तिकिट 27 मार्च रोजी होते परंतु त्यापूर्वी भारतात लॉकडाऊन लागू झाला होता. रिटर्न तिकीट हातात आहे. माझा मोठा भाऊ औद्योगिक संशोधन परिषदेत वरिष्ठ वैज्ञानिक होता. त्याची छोटी मुलगी येथे राहते, आम्ही तिला भेटायला इथे आलो होतो. पेसमेकर चाचणी आणि औषधासाठी प्रयत्न केला मोठ्या भावाला हृदयरोग आहे आणि त्याला पेसमेकर बसविण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात पेसमेकरची चाचणी घेण्यात येणार होती. तेही झालेले नाही. भावाला मधुमेहही आहे. मी देखील मधुमेहाची औषधे घेतो. ऑक्टोबर 2019 मध्ये वहिणीच्या पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया झाली. ती देखील ऑस्टियोपोरोसिसची रूग्ण आहे. आमच्यासोबत असलेली 50 वर्षांची मोठी भाची, लहानपणापासूनच जनरल डिस्टोनियाची रूग्ण आहे. आम्ही दीड महिन्यांची औषधे आपल्याबरोबर आणली. मात्र एप्रिलमध्ये सर्व औषधे संपली आहेत. 37 हजार फी आणि 1.5 लाख औषधे द्या जर 27 मार्च रोजी परतावा असल्याने आमचा विमा देखील संपला होता. आणि वैद्यकीय मदत येथे खूप महाग आहे. येथे औषधे लिहून दिल्याशिवाय उपलब्ध होत  नाहीत. मोठ्या मुलीची तब्येत ढासळली तेव्हा आम्ही येथील एका स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधला, ज्यांचे शुल्क भारतीय रुपयांमध्ये 37 हजार रुपये होते. आणि त्याने लिहिलेल्या औषधाची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. जे औषध काही हजार रुपयांना मिळते. आम्हाला इतके महागडे औषध खरेदी करता आले नाही. पुन्हा त्या डॉक्टरकडे जाण्याची हिम्मत कधीच केली नाही. आता दहा दिवसांपूर्वी आमच्या मुलाने जयपूर येथून काही औषधे पाठवली आहेत. क्वारंटाईनचा एक दिवसांचा खर्च 5 हजार दरम्यान, सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यानंतर वंदे भारत योजनेंतर्गत भारतात जाण्याची तरतूद होऊ शकते असे आढळले. त्याच्या तिकिटाची किंमत प्रति व्यक्ती 1 लाख रुपये आहे. सिंगापूर एअरलाइन्सची तिकिटे असताना आम्ही प्रति व्यक्ती 80 हजार रुपये मोजले होते. भारतात पोहोचल्यानंतरही 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार होते. त्यानंतरही आम्ही एकत्र असू व वेळेत घरी पोहोचू याबाबत साशंकता आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या