मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Independence Day: आजपासून देश संरक्षणाचा उचला विडा; सैन्यात सध्या कुठे आहेत ओपनिंग्स? माहिती एका क्लिकवर

Independence Day: आजपासून देश संरक्षणाचा उचला विडा; सैन्यात सध्या कुठे आहेत ओपनिंग्स? माहिती एका क्लिकवर

सैन्यात कुठे आहेत ओपनिंग्स? इथे बघा डिटेल्स

सैन्यात कुठे आहेत ओपनिंग्स? इथे बघा डिटेल्स

Indian Army recruitment 2022: आज आम्ही तुम्हाला अशाच काही सैन्यातील सध्या सुरु असलेल्या टॉप जॉब ओपनिंग्सबद्दल माहिती देणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 15 ऑगस्ट: स्वातंत्र्यदिन म्हंटलं की आपल्यासमोर उभा राहतो म्हणजे आपला देश आणि तिरंगा. तसंच आपल्या डोळ्यांसमोर येतात स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस झटलेले स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारी. आपल्या प्राणांची आहुती देणारे वीर आणि सीमेवर लढणारे जवान. या सर्वांना वंदन करण्यासाठी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यंदा आपला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. म्हणूनच आजपासून तरुणांनी देशसेवेचा संकल्प करण्याची गरज आहे. सध्या इंडियन आर्मीमध्ये अनेक ठिकाणी अनेक विंहागांमध्ये भरती सुरु आहे. अगदी अग्निवीरांपासून ते ITBP आणि नेव्ही या सर्व ठिकाणी निरनिराळया पोस्टसाठी भरती सुरु आहेत किंवा सुरु होणार आहेत. त्यामुळे देशसेवा करण्याचा गोल्डन चान्स आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सैन्यातील सध्या सुरु असलेल्या टॉप जॉब ओपनिंग्सबद्दल माहिती देणार आहोत. अग्निपथ योजनेअंतर्गत महिलांच्या 1000+ जागांसाठी मेगाभरती पुरुषानंतर आता महिलांसाठी केंद्र सरकारची अग्निपथ योजना (Army Agneepath Agniveer (Female) Bharti 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Army Agniveer Female Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अग्निवीर (महिला) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवरऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदभरतीची अप्लाय लिंक, नोटिफिकेशन आणि अधिक डिटेल्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. इंडियन नेव्हीत भरती भारतीय नौदलाने माहिती तंत्रज्ञान (IT) कार्यकारी शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission) अंतर्गत आधिकाऱ्यांची पदं भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली आहे. याशिवाय उमेदवार https://www.joinindiannavy.gov.in/en/careers-jobs/executive.html या लिंकवर क्लिक करूनही या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसंच इच्छुक आणि पात्र उमेदवार Indian Navy SSC Recruitment 2022 Notification PDF च्या माध्यमातून देखील अधिकृत नोटिफिकेशन (Notification) तपासू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सुमारे 50 जागा भरल्या जाणार आहेत. या पदभरतीची अप्लाय लिंक, नोटिफिकेशन आणि अधिक डिटेल्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदासाठी भरती सीमा सुरक्षा बल इंडियन आर्मी (Border Security Force) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BSF Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यालिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदभरतीची अप्लाय लिंक, नोटिफिकेशन आणि अधिक डिटेल्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. ITBP मध्ये महिलांसाठी भरती भारतीय तिब्बत सीमा पोलीस (Indo Tibetan Border Police) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ITBP Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सब इंस्पेक्टर स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 असणार आहे आर अर्ज सुरु होण्याची तारीख 17 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदभरतीची अप्लाय लिंक, नोटिफिकेशन आणि अधिक डिटेल्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. अशा आणि यानंतर या महिन्यात अजून अनेक भरती इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअर फोर्समध्ये होणार आहेत. त्यामुळे देशातील तरुणांसाठी आणि महिलांसाठी देशसेवेच्या अनेक संधी येत्या काळात उपलब्ध होणार आहेत.
First published:

Tags: Career opportunities, Independence day, Indian army, Job, Job alert

पुढील बातम्या