नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर: कोरोना विषाणूच्या (Corona Pandemic) संसर्गाचा कहर आता ओसरला असला, तरी तो अद्याप पूर्णतः संपलेला नाही. कोरोनाने लाखो जणांचे प्राण घेतले. त्यासोबतच एका सरकारी अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की 2020 या वर्षात दर दिवशी 31 बालकांनी आत्महत्या केली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बालकांवरच्या मानसिक तणावात वाढ झाली. त्यामुळे बालकांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात 2020 या वर्षात वाढ झाली. नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2020मध्ये भारतात 11,396 बालकांनी आत्महत्या केली आहे. हा आकडा 2019च्या तुलनेत 18 टक्क्यांनी, तर 2018च्या तुलनेत 21 टक्क्यांनी जास्त आहे. 2018मध्ये 9413 बालकांनी, तर 2019मध्ये 9613 बालकांनी आत्महत्या (Children Suicide) केली होती.
या आकडेवारीत 18 वर्षांखालच्या मुलांच्या आत्महत्यांचा समावेश आहे. या मुलांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणंही होती. 2020 साली कौटुंबिक कारणांमुळे 4006 मुलांनी, प्रेमप्रकरणामुळे 1337 मुलांनी, तर आजारपणामुळे 1327 मुलांनी आत्महत्या केली. काही मुलांच्या आत्महत्येमागे वैचारिक कारणं, गरिबी, नपुंसकता, नशा अशी वेगवेगळी कारणं होती. 'सेव्ह दी चिल्ड्रन' या संस्थेचे बालसंरक्षण उपसंचालक प्रभातकुमार यांनी सांगितलं, की कोविड-19, शाळा-कॉलेजेस बंद असणं, सामाजिक दुरावा वाढणं यांमुळे मुलं, तसंच तरुणांमध्ये मानसिक स्वास्थ्याच्या समस्यांत वाढ झाली आहे.
हेही वाचा- 'Miss Kerala' विजेत्या अन् उपविजेत्या सौंदर्यवतींच्या कारला भीषण अपघात; दोघींचा जागीच मृत्यू
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना प्रभातकुमार यांनी सांगितलं, 'लोकसंख्येच्या तुलनेत कमी असलेली मानसोपचारतज्ज्ञांची संख्या हा विशेष महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना आणि तरुणांना उत्साहवर्धक आणि चांगलं वातावरण उपलब्ध होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करायला हवेत, असं आवाहन 'सेव्ह द चिल्ड्रेन'कडून केलं जात आहे.'
हेही वाचा- अखेर सब्यसाचीने घेतली माघार; ती वादग्रस्त जाहिरात हटवत मागितली माफी
सेंटर फॉर अॅडव्होकसी अँड रिसर्चच्या कार्यकारी संचालिका अखिला शिवदास यांनी सांगितलं, की याच्याशी संबंधित क्षेत्रातल्या व्यक्तींच्या सहयोगाने परस्परसंवादाचं, चर्चेचं एक मॉडेल विकसित करण्याची गरज आहे, ते समाजापर्यंत नेण्याची गरज आहे. ही जबाबदारी सर्वांनी उचलली पाहिदे. पोद्दार फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी आणि मानसिक आरोग्य विशेषज्ञ प्रकृती पोद्दार यांनी सांगितलं, की आपल्या मुलांची मानसिक स्थिती किती नाजूक आहे हे आई-वडिलांनी ओळखलं पाहिजे आणि त्याचं आकलन वेळोवेळी करत राहिलं पाहिजे.
हेही वाचा- Video: मुख्यमंत्र्यांनी जिंकली सर्वांची मने, VIP कल्चर झुगारुन रुग्णवाहिकेला दिले स्थान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, India, Suicide