मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'Miss Kerala' विजेत्या अन् उपविजेत्या सौंदर्यवतींच्या कारला भीषण अपघात; दोघींचा जागीच मृत्यू

'Miss Kerala' विजेत्या अन् उपविजेत्या सौंदर्यवतींच्या कारला भीषण अपघात; दोघींचा जागीच मृत्यू

'मिस केरळ 2019'  (Miss Kerala 2019 winner) या सौंदर्य स्पर्धेची विजेती अ‍ॅन्सी कबीर (Ancy Kabeer) आणि उपविजेती अंजना शाजन (Anjana Shajan) यांच्या कारला भीषण अपघात (Car accident) झाला आहे.

'मिस केरळ 2019' (Miss Kerala 2019 winner) या सौंदर्य स्पर्धेची विजेती अ‍ॅन्सी कबीर (Ancy Kabeer) आणि उपविजेती अंजना शाजन (Anjana Shajan) यांच्या कारला भीषण अपघात (Car accident) झाला आहे.

'मिस केरळ 2019' (Miss Kerala 2019 winner) या सौंदर्य स्पर्धेची विजेती अ‍ॅन्सी कबीर (Ancy Kabeer) आणि उपविजेती अंजना शाजन (Anjana Shajan) यांच्या कारला भीषण अपघात (Car accident) झाला आहे.

तिरुअनंतपुरम, 01 नोव्हेंबर: 'मिस केरळ 2019'  (Miss Kerala 2019 winner) या सौंदर्य स्पर्धेची विजेती अ‍ॅन्सी कबीर (Ancy Kabeer) आणि उपविजेती अंजना शाजन (Anjana Shajan) यांच्या कारला भीषण अपघात (Car accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या भीषण अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मॉडेलिंग फोटोशूट करण्यासाठी गेल्या असता, एका अपघातग्रस्त दुचाकीस्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात सौंदर्यवतींच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघीही जागीच गतप्राण झाल्या आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच चाहत्यांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  'मिस केरळ 2019' या सौंदर्य स्पर्धेची विजेती अ‍ॅन्सी कबीर आणि उपविजेती अंजना शाजन या दोघींही मॉडेलिंग शूट करण्यासाठी आपल्या मूळ गावावरून कोची याठिकाणी गेल्या होत्या. दरम्यान, 31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री व्हिटिला-पलारीवट्टम महामार्गाच्या बायपासवर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. चक्करापरंबू येथील हॉलिडे इनजवळ एका दुचाकीला धडक दिल्यानंतर, अ‍ॅन्सी कबीर आणि अंजना शाजन प्रवास करत असलेल्या कारचं नियंत्रण सुटलं.

हेही वाचा-Aishwarya Rai ची एकूण संपत्ती ऐकून थक्क व्हाल; तिचे महिन्याचे उत्पन्न किती?

चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगाने असणारी ही कार थेट रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका झाडाला जाऊन धडकली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. तर अ‍ॅन्सी कबीर आणि अंजना शाजन या दोन्ही सौंदर्यवतींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील अन्य दोघं गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-या कारणामुळे केला आत्महत्येचा विचार, एका निर्णयाने बदललं Ileana D'Cruz चं आयुष्य

संबंधित दोघांवर पलारीवट्टोम येथील ईएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती देताना पालरीवट्टम पोलिसांनी सांगितलं की, ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात झाला, तो जखमी अवस्थेत घटनास्थळावरुन फरार झाला आहे.  24 वर्षीय अ‍ॅन्सी कबीर थिरुवनंतपुरम येथील रहिवासी आहे, तर 25 वर्षीय अंजना शाजन ही त्रिशूर येथील रहिवासी होती. घटनेच्या दिवशी दोघी आपल्या मूळ गावातून मॉडेलिंग फोटो शूटसाठी कोची येथे आल्या होत्या. 2019 सालच्या ‘मिस केरळ’ या सौंदर्य स्पर्धेत अ‍ॅन्सी कबीर विजेती ठरली होती, तर अंजना शाजन ही उपविजेती ठरली होती.

First published:

Tags: Kerala