मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अखेर सब्यसाचीने घेतली माघार; ती वादग्रस्त जाहिरात हटवत मागितली माफी

अखेर सब्यसाचीने घेतली माघार; ती वादग्रस्त जाहिरात हटवत मागितली माफी

गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या (Jewellery Collectio) जाहिरातीमुळे वादात सापडलेला प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) सब्यसाची मुखर्जी (Sabyasanchi Mukherjee) यांनी अखेर ती जाहिरात मागे घेतली आहे

गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या (Jewellery Collectio) जाहिरातीमुळे वादात सापडलेला प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) सब्यसाची मुखर्जी (Sabyasanchi Mukherjee) यांनी अखेर ती जाहिरात मागे घेतली आहे

गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या (Jewellery Collectio) जाहिरातीमुळे वादात सापडलेला प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) सब्यसाची मुखर्जी (Sabyasanchi Mukherjee) यांनी अखेर ती जाहिरात मागे घेतली आहे

  नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र ज्वेलरी कलेक्शनच्या (Jewelry Collection) जाहिरातीमुळे वादात सापडलेला प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) सब्यसाची मुखर्जी (Sabyasanchi Mukherjee) यांनी अखेर ती जाहिरात मागे घेतली आहे. या जाहिरातीमुळे समाजातील एक घटक दुखावला गेल्याची खंत व्यक्त करत त्यांनी माफीही मागितली आहे.

  प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी दिवाळी सणाच्या (Diwali Festival) पार्श्वभूमीवर दाखल केलेल्या खास ज्वेलरी कलेक्शनमधील डिझायनर मंगळसूत्राच्या (Designer Mangal Sutra) आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे गृहमंत्री (Madhya Pradesh Home Minister) नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी सब्यसाची यांना ही जाहिरात काढून टाकण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम देऊन त्यांच्या अटकेसाठी पोलीस पाठवण्याचा इशारा दिला होता.

  दिवाळीआधी महागाईचा जोरजार झटका, LPG Gas Cylinder च्या दरात वाढ

  या इशाऱ्यानंतर सब्यसाची यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन जारी करून ही जाहिरात मागे घेत असल्याचे जाहीर केलं. 'या मंगळसूत्र जाहिरात मोहिमेचा उद्देश वारसा आणि संस्कृतीला डायनॅमिक कॉनव्हर्सेशन बनवण्याच्या संदर्भात सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरण याविषयी बोलण्याचा होता. या मोहिमेचा उद्देश एक सणाचा होता , मात्र त्यामुळे आपल्या समाजातील एक वर्ग दुखावला गेला आहे याचे आम्हाला खूप दुःख आहे. त्यामुळेच आम्ही 'सब्यसाची'ने ही मोहीम मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.' असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  हिंदू धर्मात (Hindu Religion) मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात. लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला जीवनसाथी बनवतो. या पवित्र नात्याला दृष्ट लागू नये म्हणून त्यात काळे मणीही असतात. सब्यसाची मुखर्जी यांच्या या नवीन मंगळसूत्र कलेक्शनमध्ये लग्नाच्या पवित्र बंधनाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मंगळसूत्राची जाहिरात करताना मॉडेलने (Model) डेनिम आणि ब्रा घालून फोटो सेशन केलं आहे. तर त्यातील पुरुष मॉडेलही शर्टलेस आहे. हिंदू समाजात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या सौभाग्य अलंकाराची अशी बीभत्स जाहिरात केल्यानं हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे सोशल मीडिया यूझर्सनी सब्यसाची यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. समाजातून सब्यसाची यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली. अनेक महिलांनी त्यांची ज्वेलरी खरेदी करण्यावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले.

  पक्क्या घरांच्या इच्छेनं ग्रामस्थांना आला जोश, फावडं उचलत बांधला नवा रस्ता

  आता सब्यसाची यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर मंगळसूत्रांच्या कलेक्शनचे फोटो शेअर केले असून,यातील मंगळसूत्राची किंमत 1 लाख 65 हजार रुपयांपासून सुरू आहे.

  First published:
  top videos

   Tags: Advertisement, Jewellery shop