Home /News /national /

ज्ञानवापी मशिद : मंदिरांसाठी लढणारे वकील पिता-पुत्र पुन्हा चर्चेत! मुस्लिमांनाही हवी आहे जोडी

ज्ञानवापी मशिद : मंदिरांसाठी लढणारे वकील पिता-पुत्र पुन्हा चर्चेत! मुस्लिमांनाही हवी आहे जोडी

ज्ञानवापी मशीद प्रकरणानंतर वकील हरी शंकर जैन आणि विष्णू शंकर जैन हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. अशा प्रकारच्या एकूण 102 प्रकरणांमध्ये पिता-पुत्र दोघांपैकी एक किंवा दोघेही हिंदू बाजूने न्यायालयासमोर हजर झाले आहेत.

  नवी दिल्ली, 21 मे : अनेक देवतांच्या वतीने कोर्टात बाजू मांडणारे, आधुनिक हिंदुत्वाचे धर्मयोद्धे म्हणवले जाणारे हरी शंकर जैन (Adv. Hari Shankar Jain) आणि विष्णू शंकर जैन (Adv. Vishnu Shankar Jain) हे वकील पिता-पुत्र ज्ञानवापी-काशी विश्वनाथ मंदिर वादामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. या खटल्यानंतर सर्व्हे करणाऱ्या टीमची बाजू घेणारे वकील विष्णू शंकर जैन यांची अनेक दृष्य प्रसारमाध्यमांमध्ये दिसू लागली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं ज्ञानवापीचा (Gyanvapi-Kashi Vishwanath dispute) खटला वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात चालवण्यात यावा असं सांगितलं. या खटल्याची सुनावणी अधिक अनुभवी न्यायाधीशांकडून व्हावी असे सांगून सर्वोच्च न्यायालयानं हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग केला. “या खटल्याची सुनावणी अनुभवी न्यायाधीशांपुढे व्हावी. यामुळे कोणाचाही अपमान करण्याचा आमचा उद्देश नाही. अनुभवी न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली, तर त्यात सर्वांचंच हित जपलं जाईल,” असं सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) सांगितलं. ज्ञानवापीच्या व्हिडिओद्वारे केलेल्या सर्व्हेचे दोन अहवाल गुरुवारी (19 मे 22) न्यायालयात सादर करण्यात आले. मशिदीच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील बॅरिकेड्स लावलेल्या भिंतीकडेला मंदिराचे जुने अवशेष सापडले असून तळघरातील खांबांवर घंटा, कलश, फुलं, त्रिशूळ अशी हिंदू संस्कृतीतील शुभचिन्ह आढळल्याचं या अहवालात म्हटलं आहे. ज्ञानवापीच्या खटल्यावरील वादामध्ये हिंदूंची बाजू लढवणाऱ्या जैन पिता-पुत्रांची भूमिका जाणून घेण्याचा न्यूज 18 ने प्रयत्न केला. वकील हरि शंकर जैन यांचा जन्म 27 मे 1954 मध्ये झाला. गेल्या तीन दशकांहून अधिक म्हणजे 1976 पासून ते वकिलीचा व्यवसाय करत आहेत. लखनऊ न्यायालयापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आता उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत येऊन पोहोचला आहे. हरी शंकर जैन यांचा मुलगा विष्णू शंकर जैन 9 ऑक्टोबर 1986 रोजी जन्मले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी त्यांचं वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. तेव्हापासून ते वडिलांना व्यवसायात मदत करत आहेत. ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टीस’चे प्रवक्तेही आहेत. अयोध्येच्या रामजन्मभूमी खटल्यातील अलाहाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देत त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. 2016 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिलीसाठीची परीक्षा उत्तीर्ण करून रामजन्मभूमी खटल्यासाठी वकील म्हणून पहिल्यांदा कोर्टासमोर सादर झाले. वडिलांच्या हिंदुत्वासाठी वकिली करण्याच्या मार्गावर त्यांचे पुत्र विष्णूही चालू लागले.

  ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर होणार देशव्यापी आंदोलन! आयबीचा गंभीर इशारा

  आतापर्यंत या दोघांनी मिळून किंवा एकाने जवळपास 102 खटल्यांत कोर्टासमोर हिंदू पक्षाची बाजू मांडली आहे. यापैकी 1990 मधील मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद ही सर्वांत जुनी केस आहे. अजूनही सुरु असलेली ही केस या दोघांसाठी मोठी लढाई आहे. बाबरी मशिदीच्या खटल्यात मुसलमानांच्या बाजूने लढण्याबाबत आलेली संधी वडील हरि शंकर जैन यांनी नाकारली होती, कारण त्यांना स्वतःच्या विवेकाला बाजारात विकायचं नव्हतं, असं विष्णू शंकर जैनं यांनी वडिलांच्या वकिली व्यवसायातील धर्माच्या बाजूने लढण्याच्या भूमिकेबाबत एकदा सार्वजनिकपणे विधान केलं होतं. अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रार्थना करण्याचा अधिकार हिंदूंना मिळाल्याचं सर्वस्वी श्रेय ते त्यांचे वडील हरी शंकर जैन यांना देतात. 1949मध्ये जेव्हा वादग्रस्त बांधकामाच्या आत मूर्ती सापडल्या, तेव्हापासून 1992 मध्ये कारसेवकांकडून ते बांधकाम उद्ध्वस्त होईपर्यंत आजवर तिथं अनेक हिंदू देवतांबाबत पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर ती जागा बंद करण्यात आली होती, असं ते म्हणाले. वृंदावन तीर्थाशी संबंधित 'या' आठ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या, सविस्तर माहिती या काळात कायदेशीर कारणांमुळे हिंदूंना रामलल्लाची पूजा करणं खूपच कठीण जात होतं असं ते सांगतात. लोकांना तिथं दर्शन घेता घेऊन पूजा करता यावी यासाठी खासगी आयुष्यात अडचणी असूनही वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आणि त्यांनी रामलल्लाच्या दर्शन आणि पूजेचा अधिकार हिंदूंना मिळवून दिला असंही विष्णू म्हणाले. दरम्यान, हरि शंकर जैन यांनी धर्माच्या संरक्षणासाठी मूलतत्त्ववादी भूमिका मांडली होती “मूलतत्ववाद अंगीकारूनच कोणत्याही समाजाच्या धर्माचं संरक्षण करता येऊ शकतं. सहनशीलता धर्मविरोधी आणि चुकीची आहे. यात तारून नेण्यासाठी कठोरपणा आवश्यक आहे,” असं त्यांनी 31 जुलै 2017 ला ट्विटरवर पोस्ट केलं होतं. अर्थात अतिसहनशीलता आणि धर्मनिरपेक्षता याला आपला विरोध होता असं सांगून त्यांनी नंतर या विधानाबाबत सारवासारवही केली होती. हिंदूंच्या रक्षणासाठी सात वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भगवा रक्षक वाहिनी (BRV) या उजव्या विचारसरणीच्या संस्थेचे हरी शंकर जैन चीफ पॅट्रन आहेत. तसंच हिंद स्वराज्य पार्टीचे (HSP) राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये देशाला हिंदू राष्ट्र म्हणून नावारूपाला आणण्यासाठी या पक्षाची स्थापना करण्यात आली. ज्ञानवापीच्या खटल्यात आता अनेक गोष्टी घडत आहेत. त्यात कायद्याने हिंदूंचा असलेला हक्क हिंदूंना मिळवून देण्यात या जैन पिता-पुत्रांना यश येईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
  First published:

  Tags: Ayodhya, Masjid

  पुढील बातम्या