Home /News /national /

वृंदावन तीर्थाशी संबंधित 'या' आठ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या, सविस्तर माहिती

वृंदावन तीर्थाशी संबंधित 'या' आठ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या, सविस्तर माहिती

भगवद्गीता (Bhagavad Gita) हा हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथ मानला जातो. असं म्हटलं जातं, गीतेमध्ये मानवाच्या प्रत्येक अचडणीचं आणि प्रश्नाचं उत्तर मिळतं. अशी ही गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा (Lord Shrikrishna) उपदेश आहे.

    भगवद्गीता (Bhagavad Gita) हा हिंदू धर्मातील प्रमुख ग्रंथ मानला जातो. असं म्हटलं जातं, गीतेमध्ये मानवाच्या प्रत्येक अचडणीचं आणि प्रश्नाचं उत्तर मिळतं. अशी ही गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा (Lord Shrikrishna) उपदेश आहे. कुरुक्षेत्रावर कौरवांच्या विरोधात लढण्यापूर्वी द्विधा मनस्थितीमध्ये असलेल्या अर्जुनाला उपदेश देत असताना कृष्णानं संपूर्ण जगाला उपदेश दिला. त्यामुळे श्रीकृष्ण आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीला हिंदू धर्मामध्ये (Hinduism) पवित्र (Holy) मानलं जातं आणि मानाचं स्थान दिलं जातं. अशा गोष्टींमध्ये श्रीकृष्णाचा निवास असलेल्या ब्रजमंडळाचाही (Brajmandal) समावेश होतो. मथुरा (Mathura), गोकुळ (Gokul), नंदगाव, वृंदावन (Vrindavan), बरसाना, गोवर्धन इत्यादी ठिकाणं ब्रजमंडळात येतात. मथुरा हे श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे तर गोकुळात कृष्णानं आपल्या मोहक बाललीला दाखवल्या होत्या. बाळकृष्ण किशोरवयात आल्यानंतर वृंदावन हे त्याचं मुख्य लीलास्थान झालं. वृंदावनात रास (Rasalila) रचून कृष्णानं जगाला प्रेमाची महती शिकवली. कृष्णावरील प्रेमापायी बरसानात जन्मलेली राधा वृंदावनात राहू लागली. श्रीकृष्‍ण आणि राधेच्या (Radha) स्पर्शानं पावन झालेल्या वृंदावनामध्ये आजही काही चमत्कारिक आणि रहस्यमयी गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. वृंदावन हे ठिकाण उत्तर प्रदेशात मथुरेजवळ आहे. वेब दुनियानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 1) वृंदावन आणि तुळशीचा संबंध - वृंदा म्हणजे तुळस (Tulsi). वृंदावनमध्ये तुळशीची बाग होती म्हणून या जागेला वृंदावन असं नाव मिळालं आहे. वृंदावन म्हणजे तुळशीचं वन. या ठिकाणी तुळशीची दोन रोपं एकत्र लावली असल्याचं सांगितलं जातं. रात्रीच्यावेळी राधा आणि कृष्ण जेव्हा रासनृत्य करतात तेव्हा ही तुळशीची रोपं त्यांच्यासोबत गोपीका म्हणून नाचतात. या तुळशींचं एक पानही कोणी घेत नाही. जर एखाद्यानं गुपचूप असं केलं तर त्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. 2) रंगमहाल - वृंदावनात एक रंगमहाल आहे. मंदिराच्या आत असलेल्या या रंगमहालात दररोज कृष्ण-राधेचा पलंग ठेवून संपूर्ण महाल सजवला जातो. त्या ठिकाणी राधेच्या श्रृंगाराच्या वस्तू (Makeup) ठेवून मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. सकाळी दरवाजे उघडल्यानंतर या सर्व वस्तू विस्कळीत दिसतात. असं मानलं जातं की, राधा-कृष्ण रात्री या वस्तूंचा वापर करतात. सायंकाळनंतर हे मंदिर बंद होतं. जर कोणी लपून रासलीला पाहिली तर दुसऱ्या दिवशी तो वेडा होतो, असाही समज आहे. 3) मंदिरात झोपतात भगवान श्रीकृष्ण - भगवान श्रीकृष्ण स्वतः रोज रात्री वृंदावनातील मंदिरात झोपायला येतात, असा येथील लोकांचा समज आहे. त्यांना झोपण्यासाठी मंदिराचे पुजारी दररोज एक पलंग (Bed) स्वच्छ कापड आणि चादर अंथरूण तयार ठेवतात. सकाळी जेव्हा मंदिर उघडलं जातं तेव्हा त्या पलंगावर कुणीतरी झोपून गेल्याचं जाणवतं. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथे दररोज लोणी (Butter) आणि गुळाचा प्रसाद दिला जातो. दिवसभर भाविकांना देऊन उरलेला प्रसाद मंदिरातच ठेवला जातो. सकाळपर्यंत हा प्रसादही नाहीसा झालेला असतो. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. काही लोक याला अंधश्रद्धा मानतात तर काही लोक हा श्रीकृष्णाचा चमत्कार असल्याचं म्हणतात. 4) आपोआप बंद आणि उघडणार मंदिर - वृंदावनमध्ये श्रीकृष्णाचं असं एक मंदिर आहे ज्याचे दरवाजे आपोआप उघडतात आणि आपोआप बंद होतात. 5) भक्त हरिदास - वृंदावनच्या बांके बिहारी मंदिराशी निगडित अनेक कथा प्रसिद्ध आहेत. असं म्हणतात की, हरिदास हे श्रीकृष्णाचे सर्वांत मोठे भक्त होते. त्यांच्या भक्ती आणि चमत्कारांच्याही अनेक कथा प्रचलित आहेत. हरिदास (Haidas) जेव्हा भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन गायचे तेव्हा स्वत: भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर येऊन बसायचे, असंही म्हटलं जातं. 6) विचित्र झाडं - येथील मंदिर परिसरात वाढणारी झाडं आणि निधीवनात वाढणारी झाडंही विचित्र आहेत. कुठलंही झाड सहसा आकाशाच्या दिशेनं वाढतं. मात्र, येथील झाडाच्या फांद्या खालच्या दिशेने वाढतात. निधीवनातील (Nidhivan) झाडांची उंचीही खूप कमी आहे. शिवाय ही झाडं एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. ज्यामुळे हे ठिकाण पाहणाऱ्याला गूढ वाटतं. 7) नि‍धीवन - असं म्हणतात की आजही भगवान श्रीकृष्ण वृंदावनातील निधीवन आणि मधुवनात रास करतात. तिथल्या मंदिरांमध्ये फिरतात. श्रीकृष्ण निधीवनात रासलीला करण्यासाठी येतात आणि त्यांच्यासोबत राधेसह अष्टसख्याही येतात. दररोज रात्री आरतीनंतर श्रीकृष्ण, राधा आणि त्यांच्या गोपी रास करतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना अनेकदा घुंगरांचा आवाज ऐकू येतो. पण, ही रासलीला स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची हिंमत कोणीही करत नाही. जर एखाद्यानं असं केलं तर ती व्यक्ती आंधळी होते. त्यामुळे निधीवनाचे दरवाजे सायंकाळी सात वाजता बंद होतात. 8) घराच्या खिडक्या असतात बंद - वृंदावनाच्या आजूबाजूच्या बहुतेक घरांना खिडक्या नाहीत. ज्या घरांना खिडक्या (Windows) आहेत त्याही संध्याकाळच्या आरतीनंतर बंद केल्या जातात. जेणेकरून कुणी मंदिराच्या दिशेने बघू नये. विविध कहाण्या आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या लीलांमुळे पावन झालेल्या वृंदावन तीर्थक्षेत्री लाखो हिंदू भाविक भेट देत असतात.
    First published:

    Tags: Shri krishna janmashtami, Uttar pradesh

    पुढील बातम्या