Home /News /national /

धक्कादायक! केरळमध्ये याआधी झाला आहे हत्तीणीचा फटाक्यांमुळे क्रूर मृत्यू

धक्कादायक! केरळमध्ये याआधी झाला आहे हत्तीणीचा फटाक्यांमुळे क्रूर मृत्यू

एका गरोदर हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेले अननस खाऊन मृत्यू झाला. या प्रकरणानंतर केरळ सरकारवर टीका केली जात आहे. मात्र केरळमध्ये अशा प्रकारे हत्तीणीचा मृत्यू झाल्याची ही पहिला घटना नव्हे.

    कोची, 05 जून : केरळमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. येथे एका गरोदर हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेले अननस खाऊन मृत्यू झाला. या प्रकरणानंतर केरळ सरकारवर टीका केली जात आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र केरळमध्ये अशा प्रकारे हत्तीणीचा मृत्यू झाल्याची ही पहिला घटना नव्हे. याआधीही असाच प्रकार घडला होता. राज्यातील कोलम जिल्ह्यात एका युवा हत्तीणीचा तोंडात जखम झाल्यामुळं मृत्यू झाला होता. एका वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलम जिल्ह्याच्या पुनालुर येथील पथानापुरम जंगलात एप्रिलमध्ये आणखी एका हत्तीणीचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता.वन अधिकाऱ्यांना ही हत्तीणी जखमी अवस्थेत सापडली होती. तिच्यावर उपचारही करण्यात आले होते. मात्र त्या दरम्यानच तिचा मृत्यू झाला. उपचारानंतरही झाला हत्तीणीचा झाला जेव्हा वनाधिकाऱ्यांनी हत्तीणीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हत्तींच्या कळपात गेली. दुसर्‍याच दिवशी जेव्हा ती पुन्हा कळपातून वेगळी झाली तेव्हा तिच्यावर उपचार केले गेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या हत्तीणीनंही फटाक्यांनी भरलेली वस्तु किंवा फळ खाल्याच्या अधिकाऱ्यांना संशय आला. सध्या या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान, केरळचे वनमंत्री के. राजू म्हणाले की, हत्तींच्या मृत्यूच्या घटनांबाबत वन्यजीवनाच्या उच्च अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. तर, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की केरळमधील हत्तीच्या मृत्यूला पर्यावरण मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहे. या घटनेचा संपूर्ण अहवाल मागविला आहे. दोषीवर कठोर कारवाई केली जाईल. वाचा-केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूवरुन राहुल गांधी निशाण्यावर वाचा-गरोदर हत्तीणीला खायला दिलं फटाक्यांनी भरलेलं अननस, 3 दिवस पाण्यात उभी होती पण... गरोदर हत्तीणीचा फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊन मृत्यू ही हत्तीणी अन्नाच्या शोधात भटकत होती, 25 मे रोजी जवळच्या गावात आल्यानंतर तिला मुलांनी खायला दिलं. गर्भवती असल्यानं काहींना तिला फळ दिली. मात्र या गावातील मुलांनी फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिले. अननस खाताना अचानक फटाक्यांचा स्फोट झाला. ज्यामुळे हत्तीणीचा जबडा कापला गेला आणि दातही तुटले. वेदनांनी ग्रासलेल्या या हत्तीणीला काहीच कळलं नाही, तेव्हा ती वेलीयार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती. तीन दिवस नदीत होती उभी हत्तीणीला एवढ्या वेदना होत होत्या की ती तीन दिवस फक्त नदीत उभी होती. मात्र नदीतच तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीणीचं वय ते 14-15 वर्ष होत. हत्तीणीला योग्य वेळेत मदत मिळाली असती तरी तिचे प्राण वाचले असते. हत्तीणीची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी त्याचा बचाव करण्यासाठी दाखल झाले. पण ती पाण्याबाहेर न पडल्याने 27 मे रोजी तिचा मृत्यू झाला. वाचा-VIDEO : हत्तीच्या पिल्लानं दाखवली माणूसकी, बुडणाऱ्या तरुणाचा वाचवला जीव
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या