कोची, 3 जून : केरळ (Keral) मध्ये गर्भवती हत्तीणी मानवी क्रौर्याची बळी ठरली. तिला एका व्यक्तीने फटाक्यांनी भरलेले अननस खाण्यासाठी देण्यात आले होते, यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. प्रत्येकजण या लज्जास्पद घटनेविरोधात निषेध व्यक्त करीत आहे.
दरम्यान, भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनीही या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. त्या म्हणाले की, हे राहुल गांधींचे क्षेत्र आहे, मग त्यांनी कारवाई का केली नाही?
याप्रकरणी मेनका गांधींनी केरळमधील वायनाडमधून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले. भाजप खासदार म्हणाल्या, या प्रकरणानंतर वनसचिव हटवले जावेत. वन्यजीव संरक्षणमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा. राहुल गांधी त्या भागातील आहेत, त्यांनी कारवाई का केली नाही?
#WATCH Forest Secretary should be removed, the minister (for wildlife protection), if he has any sense, should resign. Rahul Gandhi is from that area, why has he not taken action? : Maneka Gandhi on elephant's death in Malappuram, Kerala after being fed cracker-stuffed pineapple pic.twitter.com/DmRYa6lq36
— ANI (@ANI) June 3, 2020
हे वाचा-गुजरातच्या केमिकल कारखान्यात मोठा स्फोट; 5 कामगारांचा मृत्यू, 57 जण जखमी
निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात आज कोणतीही प्रगती नाही - हवामान विभाग