मलप्पुरम (केरळ) 03 जून : उत्तर केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. येथे काही लोकांनी एका गरोदर हत्तीणीला फटाके भरलेले अननस खाण्यास दिले, त्यामुळे या हत्तीणीचा नदीत उभ्या उभ्या मृत्यू झाला. प्राणी मानवावर लगेच विश्वास ठेवतात, मात्र अशा घटनांनी माणुसकीचा अंत झाल्याचं दिसतं. ही हत्तीणी अन्नाच्या शोधात भटकत होती, 25 मे रोजी जवळच्या गावात आल्यानंतर तिला मुलांनी खायला दिलं. गर्भवती असल्यानं काहींना तिला फळ दिली. मात्र या गावातील मुलांनी फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिले. अननस खाताना अचानक फटाक्यांचा स्फोट झाला. ज्यामुळे हत्तीणीचा जबडा कापला गेला आणि दातही तुटले. वेदनांनी ग्रासलेल्या या हत्तीणीला काहीच कळलं नाही, तेव्हा ती वेलीयार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती. वाचा- म्हशीसोबत पंगा सिंहाला पडला भारी, असं काय घडलं? एकदा पाहाच हा VIDEO तीन दिवस नदीत होती उभी हत्तीणीला एवढ्या वेदना होत होत्या की ती तीन दिवस फक्त नदीत उभी होती. मात्र नदीतच तिचा मृत्यू झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीणीचं वय ते 14-15 वर्ष होत. हत्तीणीला योग्य वेळेत मदत मिळाली असती तरी तिचे प्राण वाचले असते. हत्तीणीची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी त्याचा बचाव करण्यासाठी दाखल झाले. पण ती पाण्याबाहेर न पडल्याने शनिवारी तिचा मृत्यू झाला.
वाचा- मगरींमध्ये 2 तास सुरू होती लढाई, 8 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला VIDEO
फेसबुक पोस्टमुळं आलं प्रकरण समोर वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले की ही मादी हत्ती अन्नाच्या शोधात जंगलातून जवळच्या खेड्यात फिरत होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की हत्तीणी जखमी झाल्यानंतर गावातून पळून गेली पण कोणालाही काही केलं नाही. मोहन कृष्णन यांनी या भावनिक पोस्टमध्ये, गंभीर जखमी झाली परंतु असे असूनही तिने कोणाचे नुकसान केले नाही आणि तिच्यावर हल्ला केला. मानवांवर विश्वास ठेवल्यामुळे तिला ही शिक्षा मिळाली. वाचा- वानरानं वाघाची जिरवली! हल्ला करण्याआधीच मारली थोबाडीत, VIDEO VIRAL