जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : हत्तीच्या पिल्लानं दाखवली माणूसकी, बुडणाऱ्या तरुणाचा वाचवला जीव

VIDEO : हत्तीच्या पिल्लानं दाखवली माणूसकी, बुडणाऱ्या तरुणाचा वाचवला जीव

VIDEO : हत्तीच्या पिल्लानं दाखवली माणूसकी, बुडणाऱ्या तरुणाचा वाचवला जीव

फटक्यांनी भरलेला अननस भुकेलेल्या हत्तीणीला दिला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 जून : एकीकडे निसर्गाचा प्रकोप सुरू असताना बुधवारी दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या. पहिल्या घटनेत माणुसकी सोडून भुकेलेल्या हत्तीणीला बारुदांनी भरलेला अननस खाऊ घातला आणि गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना एका बुडणाऱ्या माणसला आपला जीव धोक्यात घालून हत्तीच्या पिल्लानं वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसतंय की एक तरुण नदीमध्ये बुडतोय आणि मदतीसाठी याचना करत आहे. त्याचवेळी तिथून जाणाऱ्या हत्तीच्या कळपातील एका पिल्लू नदीत उतरुन या तरुणाचा जीव वाचवतं. नदीकाठी घेऊन येतो.

जाहिरात

दुसरी घटना केरळची विकृती आणि माणुसकी सोडून वागणाऱ्या नराधमानं भुकेलेल्या हत्तीणीला केरळमध्ये फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं. या हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटल्यानं तीचं तोंड भाजलं आणि सैरावैरा पळत सुटली पण तिने कुणालाही इजा केली नाही. पोटात असणाऱ्या पिल्ला वाजवण्यासाठी धडपडत राहिली. अखेर ती नदीच्या पाण्यात उभी राहिली आणि तिनं प्राण सोडले.

ही हत्तीण भुक लागल्यानं गावाच्या दिशेनं खायला मिळत का हे पाहण्यासाठी आली आणि तिला विकृतांनी अशा पद्धतीनं खायला दिलं. तर दुसरीकडे हत्तीच्या पिल्लानं एका माणसाचा जीव वाचवला आहे. अनेक युझर्सनी यावर आपण माणुस म्हणून घेणं लाजीरवाणी गोष्ट असल्याचं याा व्हिडीओवर म्हटलं आहे. संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात