जळगाव, 22 जून : मुलं चोरण्याच्या अफवांचं पेव जळगावातही येऊन पोहोचलंय. चाळीसगाव तालुक्यातील विसापूर इथं दोन बहुरूपी वेश धारण करून फिरणाऱ्यांना मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे या मारहाणीत भाजपचे आमदार उन्मेष पाटीलही सहभागी झाले होते. हे दोघं मुलं चोरणारे असल्याच्या संशयातून ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला केला. जमावाला शांत करताना उन्मेष पाटील यांनी एका बहुरूप्याच्या श्रीमुखात भडकावली.
जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील विसापूर येथे १५ जून रोजी घडली होती. या सहा पुरुष बहुरुप्यानी तृतीय पंथींचा वेष परिधान केला होता. त्यांच्या हालचालींचा संशय गावकऱ्यांना आल्याने त्यांना मुलं चोरणारी टोळी समजून हल्ला करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना ग्राम पंचायत कार्यालयात कोंडून ठेवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आमदार उन्मेष पाटील आणि पोलीस घटना स्थळी दाखल झाले. कुठलीही शहनिशा न करता भाजप आमदार उन्मेष पाटील यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेत या बहुरूपीना मारहाण करत असल्याची क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.
पोलिसांकडून या सहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे . पोट भरण्यासाठी विविध सोंग वठवणाऱ्या या बहुरुपियांना मारहाण प्रकरणी पोलिसात अॅट्रासिटी गुन्हा दाखल होतो का? दोषी नागरिकांबरोबरच मारहाणीत सामील झालेल्या आमदारांवर पोलीस कारवाई करतात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: उन्मेष पाटील, जळगाव, भाजप आमदार, मारहाण