रामकुमार नायक, प्रतिनिधी विलासपूर, 15 जुलै : एसडीएम ज्योती मौर्य यांचं कथित प्रेमप्रकरण समोर आल्यावर आता अनेक ठिकाणहून अनेक यशस्वी महिलांनी प्रियकरासाठी नवऱ्याला सोडल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. छत्तीसगडच्या विलासपूरमधूनही असंच काहीसं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका तरुणीने पोलिसांत भरती होताच पोलिसांच्याच मदतीने प्रियकराला बेदम मारलं आणि याबाबत कोणालाही सांगायचं नाही, अशी धमकी दिली. प्रियकराने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज गेंदले नामक व्यक्तीचं एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण होतं. दोघं अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यावेळी तरुणी एक सर्वसामान्य मुलगी होती. मात्र अलीकडेच तिची हवालदारपदी नियुक्ती झाली. पोलीस झाल्यावर तिला 53 हजार रुपयांची स्कुटी घेऊन देण्यासही सूरज तयार होता. मात्र नोकरी मिळताच तरुणीचं वागणं बदललं. एका वेगळ्याच व्यक्तीसोबत तिची जवळीक वाढली.
याबाबत सूरजने तरुणीला जाब विचारला असता, तिने त्याला बेलगहना चौकीजवळ बोलवलं आणि आपल्या पोलीस साथीदारांच्या मदतीने त्याला मारहाण केली. मारल्यानंतर त्यांनीच त्याला त्याच्या घरी सोडलं आणि याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याचं आवाहन केलं. मात्र तरुणाने मदतीसाठी पोलीस स्थानकात धाव घेतली आणि प्रेमिकेसह मारहाण करणाऱ्या पोलिसांना कठोरातली कठोर शिक्षा करा, अशी मागणी केली आहे. गाडीने उडवायचं? किंवा तू विष देऊन मार! ज्योती मौर्य प्रकरणात थरारक ऑडिओ समोर दरम्यान, सदर तरुणीनेही सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सूरज लग्नासाठी त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. आता या दोन्ही तक्रारींमध्ये किती तथ्य आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.