नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्या जर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) (upa) गेली तरी आश्चर्य वाटणार नाही, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील ( Chandrakant Patil ) यांनी लगावला.
नवी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून चंद्रकांत पाटील यांनी सेनेवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उशीरा का होईना जनतेला संबोधित करत आहेत. ते कुठून बोलतात कसे बोलतात यापेक्षा ते बोलत आहेत हे महत्वाचं आहे, उशीरा असलं तरी गरजेच आहे, असं टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
'आज राज्यातली परिस्थिती गंभीर व्यापारी अडचणीच आहे. काम केल्याशिवाय चुल पेटत नाही असं अनेक जण आहे. पण घरी बसा असं सांगून आता चालणार नाही, लोकांना काम आणि घर चालवणे गरजेच आहे, असंही पाटील म्हणाले.
तसंच, 'शिवसेनेनं आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन केली आहे. उद्या जर शिवसेना UPA मध्ये गेली तरी आता आश्चर्य वाटणार नाही', असा टोलाही पाटील यांनी लगावला.
प्रदेशाध्यक्षपद बदलणार नाही - पाटील
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होण्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली.
भाजप नेत्यांचा दिल्लीचा दौरा सुरू होताच राज्य संघटनेने बदल होतील अशा प्रकारच्या वृत्ताना हवा मिळाला सुरुवात झाली होती. मात्र दुपार होताच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे सर्व वृत्त फेटाळून लावले. भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा आमच्या पक्षात नसून या चर्चा फक्त मीडियात आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. भारतीय जनता पक्ष मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची एक प्रक्रिया आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ मिळतो. दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.