ठाणे, 08 ऑगस्ट: अनेकांना मासे खाण्याची प्रचंड आवड असते. आठवड्यातून किमान दोन तीन वेळा तरी माशांवर ताव मारणारेही भरपूरजण आहेत. पण अशा मासे प्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड बारवी धरण आणि मुरबाड नदीतील गोड्या पाण्यातील माशांमध्ये 4 ते 6 इंचाचे लांबलचक जंतू आढळून आले आहे. हे माशाच्या पोटात आतील बाजूने आहेत. त्यामुळे बाहेरील बाजूने ते सहजपणे दिसत नाहीत. येथील माशांना जवळपास मागील दोन वर्षांपासून अशा संसर्गानं ग्रासलं असल्याची माहिती समोर येत आहे.
बाहेरील बाजूने अगदी निरोगी वाटणाऱ्या माशाला देखील आतल्या बाजूने हे संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. येथील माशांमध्ये 4 ते 6 इंच लांबीचे लाल आणि पांढऱ्या रंगाच्या दोऱ्याप्रमाणे या जंतूचा आकार आहे. हा व्हिडी समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
हेही वाचा-VIDEO : गजराजाला आला राग; हत्तीने शेपटी धरून मगरीला पाण्यातच आपट आपट आपटलं
माशांच्या पोटात आढळणाऱ्या या जंतुंमुळे ग्राहक आणि मासे विक्रेत्यांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली आहे. शिवाय अनेकांनी मासे खाणंही बंद केलं आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे मासेविक्रेते हतबल झाले आहे. माशांच्या पोटात सापडणाऱ्या या जंतुंचे निदान आणि माशांना होणार प्रादुर्भाव कसा रोखता येईल, याबाबत सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पण तूर्तास हा व्हिडीओ समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा-बापरे! मजेमजेत चक्क सिंहाच्याच तोंडात टाकला हात; पुढे काय घडलं पाहा VIDEO
शुक्रवारी मत्स्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी बारवी धरणातील मासेमारी होत असलेल्या जागांची प्रत्यक्षात पाहणी केली आहे. त्यांनी तेथील विविध ठिकाणचे विविध प्रकारच्या माशांचे ताजे नमुने गोळा केले आहेत. तसेच हे नमुने पुढील तपासणी आणि निरीक्षणासाठी मत्स्य जीव शास्त्रज्ञांकडे पाठवण्यात आले आहे. संबंधित जंतु नेमके कसले आहेत. याबाबत काहीही माहिती अद्याप समोर आली नाही. यातून मासे खाणाऱ्या लोकांनाही संसर्ग होतो का? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.