मराठी बातम्या /बातम्या /देश /

विमानाने उड्डाण घेतल्यावर प्रवाशाचा मृत्यू झाल्यावर काय करतात? कुठं ठेवतात मृतदेह? वाचा सविस्तर

विमानाने उड्डाण घेतल्यावर प्रवाशाचा मृत्यू झाल्यावर काय करतात? कुठं ठेवतात मृतदेह? वाचा सविस्तर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

विमान प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची तब्येत जास्त बिघडली तर पायलट जवळच्या विमानतळावर विमान लँडिंग करतो, जेणेकरून प्रवाशाचा जीव वाचू शकेल.

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: विमानाने (flight) प्रवास अनेकांनी केला असेल. पण अजूनही असे बरेच लोक असतील, ज्यांनी कधी विमानात पाऊलही ठेवलं नसेल. एखादी व्यक्ती विमानाने पहिल्यांदाच प्रवास (travels on a plane) करीत असेल, तर तो अनुभव त्याच्यासाठी खूप छान असतो. विमान प्रवास (flight journey) लोकांसाठी रोमांचक असला तरी या प्रवासात काही समस्याही (problems) निर्माण होतात. या प्रवासादरम्यान एखाद्याचा मृत्यू (Death in Flight) झाल्याची घटनाही तुम्ही ऐकली असेल. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, विमान प्रवासात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू (What happens if passenger dies during flight journey?) झाला तर त्यानंतर विमानातील कर्मचारी कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात.

डेली स्टार वेबसाइटच्या वृत्तानुसार, विमान प्रवासात एखाद्या प्रवाशाची तब्येत (How air hostess deals with medical emergency?) बिघडली तर सर्वप्रथम एअर होस्टेस आणि फ्लाइट अटेंडंट त्या प्रवाशाला प्राथमिक उपचार सुविधा देतात. प्रवासात अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास औषधे किंवा सीपीआर सारख्या गोष्टी कशा पद्धतीने द्याव्यात, याचं प्रशिक्षण विमानातील कर्मचार्‍यांना दिलेलं असतं.

वाचा : YouTuber चा माकडांकडून पाठलाग, डोळ्यांदेखत लुटली खास वस्तू

विमानात एखाद्याचा मृत्यू झाल्यास ?

विमान प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची तब्येत जास्त बिघडली तर पायलट जवळच्या विमानतळावर विमान लँडिंग करतो, जेणेकरून प्रवाशाचा जीव वाचू शकेल. पण विमानातच एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर संबंधित प्रवाशाचा मृतदेह विमानातील सर्वात शेवटी असणाऱ्या रिकाम्या सीटवर ठेवला जातो किंवा बिझनेस क्लासमध्ये मृतदेह ठेवला जातो. जेणेकरून तो इतर प्रवाशांना दिसणार नाही. याबाबत बिझनेस इनसाइडरशी बोलताना फ्लाइट अटेंडंट अँटे लाँग म्हणाले की, 'आम्ही मृत शरीराला ब्लँकेटने झाकतो, जेणेकरून इतर लोक मृतदेह पाहू शकणार नाहीत.'

वाचा : World Record: ‘या’ देशात कडाडली जगातील सर्वात मोठी वीज, लांबी वाचून वाटेल आश्चर्य

महिलेने शेअर केला तिचा वैयक्तिक अनुभव

क्युरा (Quora) वेबसाइटवर एका महिलेने स्वतःचा अनुभव शेअर करताना सांगितले की, 'मी व माझे पती लॉस अँजेलिसहून ऑकलंडला विमानाने जात होतो. तेव्हा वाटेत माझ्या पतीचा मृत्यू झाला. विमानातील कर्मचाऱ्याने हे पाहिले. त्यानंतर प्रवास करणार्‍या एका डॉक्टरने माझ्या पतीला तपासले आणि ते मृत झाल्याचे सांगितले. यानंतर माझ्या पतीचे शरीर ब्लँकेटने झाकण्यात आले.' अर्थात अनेकदा विमानात एखाद्याचा मृत झाल्याचे घोषित केले जात नाही. एखाद्या व्यक्तीसोबत अशी दुर्देवी घटना घडली, तर अशा वेळी लँडिंगनंतर संबंधित व्यक्तीची तपासणी केली जाते, त्यानंतर डॉक्टर नेमकं काय झालं आहे, ते सांगतात.

विमानाने प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण हा प्रवास करताना काही नियम लक्षात ठेवल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

First published:

Tags: Death, Domestic flight, India, International, Problems, Travel by flight, Two passengers