जाहिरात
मराठी बातम्या / Viral / YouTuber चा माकडांकडून पाठलाग, डोळ्यांदेखत लुटली खास वस्तू; VIDEO झाला VIRAL

YouTuber चा माकडांकडून पाठलाग, डोळ्यांदेखत लुटली खास वस्तू; VIDEO झाला VIRAL

YouTuber चा माकडांकडून पाठलाग, डोळ्यांदेखत लुटली खास वस्तू; VIDEO झाला VIRAL

व्हिडिओचं शूटिंग सुरू असताना एका प्रसिद्ध यूट्यूबरवर दोन माकडांनी हल्ला केला आणि त्याच्या बॅगेतील एक खास गोष्ट पळवून नेली.

  • -MIN READ
  • Last Updated :

केपटाऊन, 1 फेब्रुवारी: शूटिंगसाठी (Shooting) दक्षिण अफ्रिकेत (South Africa) गेलेल्या लोकप्रिय यूट्यूबरला (Youtuber) माकडांचा (Monkeys) भयंकर अनुभव आला. शूटिंग सुरू असतानाच अचानक माकडांनी हजेरी लावली. काय घडतंय हे कळेपर्यंत त्याला माकडांनी घेरलं होतं. काय करावं हे त्याला समजत नव्हतं. काही क्षणांतच माकडाने त्याच्या बॅगेचा ताबा घेतला आणि त्यातून आपल्याला हवी असणारी गोष्ट घेऊन त्याने पोबारा केला.   दक्षिण अफ्रिकेत शूटिंग लोगान पॉल नावाचा यूट्यूबर तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तरुणांचा आयकॉन असणारा लोगान दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊनमध्ये नव्या एपिसोडचं शूटिंग करत होता. ‘द सन’नं दिलेल्या माहितीनुसार शूटिंग सुरू असताना अचानक दोन माकडं घटनास्थळी आली. पार्किंग लॉटप्रमाणे दिसणाऱ्या ठिकाणी लोगान उभा असल्याचं या व्हिडिओत दिसतं. एका गाडीच्या टपावर माकडाने उडी मारली आणि लोगानकडे झेपावण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करत लोगान गाडीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे आला. मात्र तेवढ्यात दुसरं माकडही तिथे आलं.  

जाहिरात

माकडाने उघडली बॅग लोगान आणि त्याचा कॅमेरामन शूटिंगमध्ये व्यस्त असताना दोन माकडांनी एकदम हजेरी लावली. एका माकडापासून स्वतःचा बचाव करत लोगानने पळ काढला खरा, पण तेवढ्यात दुसरं माकड त्याच्यासमोर दत्त म्हणून उभं राहिलं. त्यावर “आता ही माकडं काय माझ्या …चा चावा घेणार की काय?” असा प्रश्न लोगान त्याच्या कॅमेरामनला विचारतो. त्यावर हे माकड तुझा कॅमेरा घेऊन जाणार असं दिसतंय, असं कॅमेरामन म्हणतो.   हे वाचा -

माकडाने पळवले ड्रिंक लोगाननं जवळच ठेवलेल्या कॅमेऱ्याच्या बॅगवर माकडाने ताबा मिळवला आणि ती बॅग उघडली. आता माकड कॅमेरा काढून नेणार असंच दोघांना वाटलं. मात्र माकडाला कॅमेऱ्यात काहीही रस नव्हता. त्याने बॅगेत असणारी एनर्जी ड्रिंकची बाटली घेतली आणि ते पळून गेलं. या घटनेचा व्हिडिओ लोगाननं सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला 27 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात