न्यूयॉर्क, 1 फेब्रुवारी: अमेरिकेत (America) दोन वर्षांपूर्वी कडाडलेली वीज (Lightning) ही जगातील सर्वात मोठी वीज (Megaflash) असल्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघानं (United Nations) केली आहे. एकाच वेळी तब्बल 770 किलोमीटर (477.2 Miles) परिसरात ही वीज झाली आणि जागतिक विक्रमाची (New World Record) नोंद झाली, अशी माहिती जाहीर करण्यात आली आहे. या वीजेनं त्यापूर्वीचे मोठ्या आणि लांब वीजांचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. सर्वात लांब वीज 20 एप्रिल 2020 या दिवशी दक्षिण अमेरिकेत झालेली वीज ही आतापर्यंतची सर्वात मोठी वीज ठरली आहे. 477.2 मैल म्हणजेच सुमारे 770 मीटर परिसरात ही वीज झाली. अमेरिकेतील मिसिसिपी, लुसीयाना आणि टेक्सास या भागांना व्यापणारी ही वीज होती. वीजेचं हे अंतर म्हणजे न्यूयॉर्क आणि कोलंबस यांच्यातील अंतराएवढं आहे. किंवा लंडन आणि जर्मनीतील शहर हँमबर्ग यांच्यात जेवढं अंतर आहे, तेवढ्या लांबीची ही वीज झाली. महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यापासून नागपूरपर्यंत जेवढं अंतर आहे, त्यापेक्षाही अधिक अंतरात ही वीज चमकल्याचं दिसून आलं. जुना विक्रम मोडला यापूर्वी 31 ऑक्टोबर 2018 रोजी सर्वात लांब वीजेचा विक्रम नोंदवण्यात आला होता. दक्षिण ब्राझील परिसरात ही वीज कडाडली होती. मात्र त्या वीजेच्या लांबीपेक्षा नव्याने नोंदवण्यात आलेल्या वीजेची लांबी ही तब्बल 60 किलोमीटर अधिक असल्याचं दिसून आलं आहे. हे वाचा -
आणखी एका विक्रमाकडे लक्ष वीज चमकायला सुरुवात झाल्यापासून सलग किती वेळ ती चमकत होती, याचा रेकॉर्डही या वीजेच्या नावे जमा होऊ शकतो का, हे लवकरच समजणार आहे. त्यावर सध्या शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरू आहे. यापूर्वी 18 जून 2020 रोजी उरुग्वे आणि अर्जेंटिना यांच्यादरम्यान चमकलेल्या वीजेच्या नावे हा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. त्यावेळी 17.1 सेकंद सलग वीज चमकली होती.