गूड न्यूज! कोरोनाव्हायरसविरोधात औषध सापडलं; भारतातील शास्त्रज्ञांचा दावा

गूड न्यूज! कोरोनाव्हायरसविरोधात औषध सापडलं; भारतातील शास्त्रज्ञांचा दावा

वनऔषधीमध्ये (Herbal Plant) कोरोनाव्हायरसविरोधात (Coronavirus) प्रभावी ठरेल असा घटक सापडला आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जून : कोरोनाव्हायरसविरोधात (Coronavirus) लस विकसित करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ जुटलेत. शिवाय उपलब्ध असलेल्या विविध आजारांवरील औषधांंचं (medicine) ट्रायल कोरोनावर उपचारासाठी केलं जातं आहे. अशात एक आनंदाची बातमी म्हणजे कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी ठरेल असं औषध सापडलं आहे, असा दावा भारतातील शास्त्रज्ञांनी केला आहे. वनऔषधींमध्ये (Herbal Plant) असा घटक सापडला आहे, जो कोरोनाव्हायरसवर उपचार ठरू शकतो, असं शास्त्रज्ञ म्हणालेत.

इंडियन काऊन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हरयाणातील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वॉइन्सच्या  (NRCE) शास्त्रज्ञांनी काही वनऔषधींचा कोरोनाव्हायरसवर प्रयोग करून पाहिला. VTC-antiC1 या नैसर्गिक घटकात कोरोनाशी लढण्याची क्षमता असल्याचं शास्त्रज्ञांना दिसून आलं.

हे वाचा - गेल्या 24 तासांत भारताने रेकॉर्ड मोडला, समोर आली सगळ्यात जास्त आकडेवारी

शास्त्रज्ञांनी VTC-antiC1 हा नैसर्गिक घटकाचा  1930 साली थैमान घालणाऱ्या  इन्फेक्शिअस ब्राँकायटिस व्हायरस (infectious bronchitis virus  - IBV) ज्याला चिकन कोरोनाव्हायरस असंही त्यावर प्रयोग करून पाहिला. प्राथमिक अभ्यासात VTC-antiC1 या नैसर्गिक घटकाचा कोरोनाव्हायरविरोधात चांगला परिणाम दिसून आला आहे. याच अभ्यासाच्या आधारावर VTC-antiC1 मध्ये कोरोनाव्हायरसवर उपचार करण्याची क्षमता असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

हे वाचा - इतर आजारासाठी रुग्णालयात गेला पण, झाली कोरोनाची लागण; तरुण पत्रकारानं गमावला जीव

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वॉइन्सचे डायरेक्टर जनरल (अॅनमिल सायन्स) बीएन त्रिपाठी यांनी सांगितलं, "आम्हाला संशोधनात औषधी झाडं व्हायरसविरोधात चांगला परिणाम देत असल्याचं दिसलं. वनऔषधींचा वापर सध्या अनेक आयुर्वेदिक औषधं बनवण्यासाठी केला जातो आहे. हीच औषधी झाडं जर कोरोनाव्हायरसचा नाश करतील तर फक्त देशच नाही तर संपूर्ण जगासाठी ही आनंदाची बातमी असेल"

हे वाचा - 'कोरोना से आज पूरा देश लड़ रहा है...' या कॉलर ट्यूनमधला आवाज कोणाचा आहे?

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 7, 2020, 3:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या