हैदराबाद, 7 जून: देशात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. हैदराबाद येथे रविवारी सकाळी एका तेलगू वृत्तवाहिनीच्या तरुण पत्रकाराचा मृत्यृ झाला. मनोज कुमार असं मृत पत्रकाराचं नाव आहे. एक दिवसापूर्वीच मनोज कुमार याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
मनोज कुमार हा मायस्थेनिया ग्रेविस (Myasthenia Gravis) या आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर हैदराबाद येथील गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मनोजवर थाइमस ग्रंथीची सर्जरी करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याने रविवारी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांला अखेरचा श्वास घेतला.
हेही वाचा... कोरोना व्हायरसचा नायनाट करणारी लस लवकरच, 'या' फार्मा कंपनीनं केला करार
मनोज कुमार याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यात त्याला निमोनियाही झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं गांधी हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
कोरोनाचा कहर सुरूच..
संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. भारतात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. देशभरात 24 तासांत 9971 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा 2.46 लाखांवर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात 1 लाख 19 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
हेही वाचा......तर तुमच्या घरात कचरा आणून टाकेन, शिवसेना नेत्यानं अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
महाराष्ट्रात काल 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 37390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 82968 इतका झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात 2969 जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus