मराठी बातम्या /बातम्या /देश /

'कोविड-19 से आज पूरा देश लड़ रहा है...' या कॉलर ट्यूनमधला आवाज कोणाचा आहे?

'कोविड-19 से आज पूरा देश लड़ रहा है...' या कॉलर ट्यूनमधला आवाज कोणाचा आहे?

कॉलर ट्यूनमधील आवाज प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टीस्ट जसलीन भल्ला यांचा आहे.

कॉलर ट्यूनमधील आवाज प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टीस्ट जसलीन भल्ला यांचा आहे.

कॉलर ट्यूनमधील आवाज प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टीस्ट जसलीन भल्ला यांचा आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 07 जून : जगभरात मागच्या पाच महिन्यात तर भारतात तीन महिन्यांपासून थैमान घालत असलेल्या कोरोना विरुद्ध आपण सगळेच लढत आहोत. विविध स्तरांतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी जनजागृती केली जाते. अगदी सार्वजनिक ठिकाणांपासून ते फोनच्या कॉलरट्यून पर्यंत वेगवेगळ्या पातळीवर ही जगजागृती सुरू आहे.

आपण फोन केला की आपल्याला कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येते., 'आज संपूर्ण देश कोरोना विषाणू किंवा कोविड -19 बरोबर लढा देत आहे. परंतु लक्षात ठेवा, आपल्याला रुग्णांविरुद्ध नाही तर रोगाविरुद्ध लढायचं आहे. त्यांच्याशी भेदभाव करू नका. त्यांची काळजी घ्या आणि हा रोग टाळण्यासाठी आपली ढाल असलेल्या डॉक्टरांचा, जसे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, स्वच्छता कामगार इत्यादींचा सन्मान करा. त्यांना पूर्ण पाठिंबा द्या. या योद्ध्यांची काळजी घ्या, कोरोनायोद्धांची काळजी घेतली तर देश कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकेल. अधिक माहितीसाठी राज्य हेल्पलाइन क्रमांक किंवा केंद्रीय हेल्पलाइन क्रमांक 1075वर फोन करा. भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी अशी संपूर्ण ट्यून हिंदीमध्ये वाजते.

हे वाचा-गेल्या 24 तासांत भारताने रेकॉर्ड मोडला, समोर आली सगळ्यात जास्त आकडेवारी

ही ट्यून ऐकत असताना हा आवाज कोणाचा आहे असा कधी प्रश्न पडला आहे का? य़ाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. हा कॉलर ट्यूनमधील आवाज प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टीस्ट जसलीन भल्ला यांचा आहे.

जसलीन भल्ला यांनी टीव्ही आणि रेडिओवरील अनेक जाहिराती आणि अशा उपक्रमांना आवाज दिला आहे. याआधी त्यांनी अनेक वर्ष क्रीडा पत्रकार म्हणून काम केलं आहे. एक क्रीडा पत्रकार म्हणून त्यांनी सुरुवात केली खरी परंतु नंतर त्या पूर्णवेळ व्हॉइस ओव्हर आर्टीस्ट म्हणून काम करू लागल्या. त्या या क्षेत्रात पूर्ण वेळ मागच्या 10 वर्षांपासून काम करत आहेत.

हे वाचा-FIR नंतर हिंदुस्तानी भाऊची एकता कपूरला लीगल नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Coronavirus