गेल्या 24 तासांत भारताने रेकॉर्ड मोडला, समोर आली आतापर्यंतची सगळ्यात जास्त आकडेवारी

गेल्या 24 तासांत भारताने रेकॉर्ड मोडला, समोर आली आतापर्यंतची सगळ्यात जास्त आकडेवारी

मागच्या 24 तासांत 9971 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जून : देशात कोरोना (Coronavirus)रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा रुग्णांची विक्रमी संख्या समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, मागच्या 24 तासांत 9971 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शविवारी वाढलेल्या रुग्णांमुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून 2 लाख 46 हजार 628 झाली आहे.

शुक्रवारी कोरोनाची 9887 नवीन प्रकरणं नोंदली गेली होती, तर कोरोनामुळे 294 लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत आता भारताने स्पेनलाही मागे टाकलं आहे. देशात सध्या कोरोनाची 1,20,406 सक्रिय प्रकरणं असून कोरोना साथीच्या आजारामुळे 6,929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1,19,292 लोक बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

देशात कोव्हिड - 19 (Covid-19 Infection) वाढत्या रुग्ण संख्येमुळे भारताने स्पेनला (Spain) मागे टाकत 5वा संक्रमित देश बनला आहे. जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीच्या (John Hopkins university) आकडेवारीनुसार, भारतात कोरोना संक्रमणाची (Coronavirus Infection) एकूण 2,43,733 इतकी प्रकरणं आहेत. याबरोबरच भारत काही आकड्यांनी स्पेनच्याही पुढे निघून गेला.

पुण्यात मद्यपींना जाब विचारल्यामुळे माजी आमदारांना धक्काबुक्की, दोघांना अटक

याच्याआधी शनिवारी आलेल्या आकड्यांवरून भारत इटलीला मागे टाकत साथीच्या रोगामुळे सर्व देशांमध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या भारत जगातील सहावा देश बनला होता. पण आता भारतात पुन्हा कोरोनाच्या आकड्यांनी कहर केला आहे. त्यामुळे आता स्पेनलाही मागे टाकून 5 वा सर्वात संक्रमित देश बनला आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 3,000 मृत्यू

कोरोना व्हायरसचा सगळ्यात मोठा परिणाम हा महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रात शनिवार कोव्हिड-19 मुळे मुंबईत 58 लोकांसह आणखी 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या महामारीमुळे आतापर्यंत मृतांची संख्या 2,969वर पोहोचली आहे. तर 2,739 नवी प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 82,968 झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र कोव्हिज-19 मुळे रुग्ण बरे होण्याचा दर 45.06 टक्क्यांपर्यंत आहे तर मृत्यूदर 3.57 टक्के आहे.

डाळभातावरून दोघांची केली हत्या, 6 गाड्या बदलून आरोपी मुंबईहून पुण्यात

संपादन - रेणुका धायबर

First published: June 7, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या