मुंबई, 17 मार्च: आई (Mother) झाल्याशिवाय लग्नाचं सार्थक झालं नाही, असा समज आपल्या देशामध्ये आहे. त्यामुळे आई होणं (Motherhood) हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. मूल झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. तिच्या प्रायॉरिटीज बदलतात. तिचं सर्व लक्षं आपल्या बाळावर केंद्रीत होतं. बाळाच्या संगोपनासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करते. मूल कितीही मोठं झालं तरी आईची ही माया (Affection) कधीच कमी होत नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिला आपल्या मुलाची काळजी असते. एकूणच काय तर एक आई आणि तिचं मूल यांच्यातील नातं (Mother Child Bond) खूपच सुंदर आणि मौल्यवान असतं. मात्र, काही मुलांना याची जाणीव नसते. एका आयएएस ऑफिसरनं (IAS Officer) हीच गोष्ट आपल्या ट्विटद्वारे (Tweet) सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आयएएसच्या ट्विटवर (IAS Tweet) नेटिझन्सनी (Netizens) विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला इमोशनल मेसेज (Emotional Message) म्हटलं आहे. काहींच्या मते, क्वचितच एखादा मुलगा आपल्या आईला अशी वागणूक देतो. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. DRDO ने विक्रमी 45 दिवसांत उभारली बहुमजली इमारत, प्रगत फायटर जेट इथं तयार होणार आयएएस ऑफिसर अवनीश शरण (IAS Officer Awanish Sharan) यांनी आई आणि मुलाच्या नात्यासंबंधी एक ट्विट केलं आहे. सध्या हे ट्विट फारच व्हायरल होत आहे. ट्विटर बायोनुसार, अवनीश शरण हे छत्तीसगड केडरमधील (Chhattisgarh Cadre) 2009 बॅचचे ऑफिसर आहेत. ते सोशल मीडियावर (Social Media) खूप अॅक्टिव्ह असतात. ट्विटरवर त्यांचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स (Twitter Followers) आहेत.
It hurts.💔 pic.twitter.com/NGzMJto3D9
— Awanish Sharan 🇮🇳 (@AwanishSharan) March 16, 2022
आयएएस अवनीश शरण यांनी काही दिवसांपूर्वी एक फोटो वापरून ट्विट केलं होतं. त्याला त्यांनी ‘इट हर्ट्स’ असं कॅप्शनही दिलं होतं. अवनीश यांनी ट्विटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एक वृद्ध महिला हातामध्ये पिशवी घेऊन बेंचवर बसलेली दिसत आहे. फोटोवर ‘नऊ मेसेजेस आणि सात मिस्ड कॉल्स’असं लिहिलेलं आहे. या फोटोसोबत आई आणि मुलातील संवाद दर्शवणाऱ्या काही ओळीदेखील आहेत. मुलगा आईला म्हणतो, ‘ऑफिसमध्ये कामात असताना मला डिस्टर्ब करू नको असं मी तुला सांगितलेलं आहे.’ त्यावर आई उत्तर देते की, ‘मी ऑफिसच्या बाहेर तुझी वाट पाहत आहे कारण तू जेवणाचा डबा विसरून आला होतास.’ या ओळींचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. आई डबा देण्यासाठी मुलाला फोन करते आहे तर मुलाला तो डिस्टर्बन्स वाटतोय. 40 पैशांसाठी कोर्टात जाणं ग्राहकाला पडलं महागात; बसला 4000 रुपयांचा फटका आयएएस अधिकाऱ्याच्या या ट्विटवर शेकडो युजर्सनी (Users) प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी याला हृदयस्पर्शी (Heart Touching) तर काहींनी भावनात्मक (Emotional) पोस्ट म्हटलं आहे. ‘आईला अशी वागणूक देणारी मुलं मी फक्त चित्रपटातच पाहिली आहेत’, अशी कमेंट एका युजरनं केली आहे. तर एका युजरनं, असामान्य परिस्थिती अशी कमेंट केली आहे. एकूणच आयएएस अवनिश यांच्या ट्विटवर नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.