जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 40 पैशांसाठी कोर्टात जाणं ग्राहकाला पडलं महागात; बसला 4000 रुपयांचा फटका

40 पैशांसाठी कोर्टात जाणं ग्राहकाला पडलं महागात; बसला 4000 रुपयांचा फटका

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

40 पैशांसाठी रेस्टॉरंटविरोधात कोर्टात जाणं ग्राहकाला चांगलंच महागात पडलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मार्च : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की एखादी बिलाची रक्कम आपण जेव्हा भरतो. तेव्हा तिथं 60 पैसे असतील तर त्याबदल्यात 40 पैसे जादा घेऊन आपल्याकडून एक रुपया आकारला जातो. 40 पैसे ही तशी मोठी रक्कम नाही आणि 40 पैसांचं नाणंही चलनात नाही. त्यामुळे तसं या 40 पैशांना काही महत्त्व नाही. त्यामुळे आपण त्याकडे फार लक्ष देत नाही. 60 पैसे झाले की त्याऐवजी एक रुपयाच देतो. पण एका वृद्ध व्यक्तीने मात्र 40 पैसेही सोडले नाही  (Man Sues Restaurant for 40 paise Overcharge) . त्याने 40 पैशांचा हिशेब मागण्यासाठी कोर्टात धाव घेतली आणि त्याला तब्बल 4000 रुपयांचा फटका बसला  (Man Fined for 4000 rs in Consumer Court). बंगळुरूत एका व्यक्तीला 40 पैशांसाठी रेस्टॉरंटविरोधात केस करणं चांगलंच महागात पडलं आहे. रेस्टॉरंटविरोधात तो कोर्टात गेला, पण आपलाच डाव आपल्यावर उलटेल असं त्याला वाटलं नव्हतं. 40 पैसे तर मिळाले नाहीच उलट त्याला भरपाई म्हणून 4000 रुपये द्यावे लागले. मे 2021 मध्ये मूर्ती नावाची एक वृद्ध व्यक्ती बंगळुरूच्या  (Bengaluru) सेंट्रल स्ट्रीटमधील होटल एम्पायरमध्ये (Hotel Empire on Central Street) गेली. तिथं रेस्टॉरंटने बिल दिलं, ते पाहून मूर्ती यांनी रेस्टॉरंटच्या स्टाफसोबत वाद घातला. मूर्ती यांच एकूण बिल 264.60 रुपये झालं. रेस्टॉरंटच्या स्टाफने मूर्ती यांना बिलची राऊंड फिगर 265 रुपये द्यायला सांगितलं. पण त्यासाठी मूर्ती यांनी नकार दिला. रेस्टॉरंट 40 पैसे ओव्हरचार्ज मागत आहे, असं ते म्हणाले. रेस्टॉरंटकडून त्यांना याचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही तेव्हा त्यांनी ग्राहक कोर्टात धाव घेतली. हे वाचा -  लवकरच असं काम करणार नवरा की खूश झाली बायको; गिफ्ट केली 5 कोटींची लक्झरी कार टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मूर्ती यांनी कोर्टात सांगितलं की यामुळे त्यांना मानसिक आघात झाला आहे, दुःख झालं आहे. त्यांना एक रुपयाची भरपाई मागितली. रेस्टॉरंटमार्फत असलेल्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अॅक्ट 2017 च्या सेक्शन 170 अंतर्गत बिलात जवळील राऊंड फिग देता येऊ शकतं, अशी परवानगी देण्यात आली आहे. सरकारने 50 पैसे बंद केले आहेत. त्यामुळे 50 पैशांची राऊंड फिगर एक रुपयाच मानली जाईल, असं सांगितलं. त्यामुळे रेस्टॉरंटने 60 पैशांना 1 रुपये चार्ज केलं. हे वाचा -  कमी पगार असल्याने कर्मचाऱ्याने लढवली अजब शक्कल; केलं असं काम की HR ही शॉक इतकंच नव्हे तर कोर्टाने मूर्ती यांना कोर्टाचे पैसे वाया घालवल्याप्रकरणी आणि भरपाई असं मिळून 4000 हजार रुपये द्यायला सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात