नवी दिल्ली, 17 मार्च : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने बंगळुरू येथील एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADE) येथे फ्लाइट कंट्रोल सिस्टमसाठी (flight control system) संस्थात्मक तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी 45 दिवसांत एक बहुमजली इमारत बांधली आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या 7 मजली इमारतीत भारतीय हवाई दलासाठी (Indian air force) पाचव्या पिढीचे, मध्यम-वजन, खोल-श्रेणीचे लढाऊ विमान विकसित करण्यासाठी रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सुविधा असतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज या इमारतीचं उद्घाटन केलं. DRDO ने ADE, बंगळुरू येथे उड्डाण नियंत्रण प्रणालीसाठी हायब्रीड तंत्रज्ञानाद्वारे बहुमजली पायाभूत सुविधांचं बांधकाम विक्रमी 45 दिवसांत पूर्ण केलं, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. ते म्हणाले की, प्रगत मध्यम लढाऊ विमान (AMCA) प्रकल्पांतर्गत लढाऊ विमानं आणि फ्लाइट कंट्रोल सिस्टम (FCS) साठी एव्हीओनिक्स विकसित करण्याची सुविधा या कॉम्प्लेक्समध्ये असेल. हे वाचा - आता 200 किमी प्रतितास वेगाने धावणार Vande Bharat ट्रेन! भारत आपली हवाई उर्जा क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यासाठी प्रगत स्टेल्थ वैशिष्ट्यांसह पाचव्या पिढीचं मध्यम-वजन, खोलवर मारा करणाऱ्या श्रेणीचं लढाऊ विमान विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी AMCA प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पाचा प्रारंभिक विकास खर्च अंदाजे 15,000 कोटी रुपये आहे. संरक्षण मंत्रालयानं सोमवारी सांगितलं की AMCA च्या डिझाईन आणि प्रोटोटाइप विकासासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे वाचा - भगवंत मान आज करणार मोठी घोषणा; Tweet करत म्हणाले, ‘इतिहासात आजवर…’ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, AMCA प्रकल्प आणि संबंधित क्रियाकलापांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशानं केवळ 45 दिवसांच्या ‘किमान कालावधीत’ संपूर्ण बांधकाम तंत्र वापरून इमारत बांधण्यात आली आहे. 22 नोव्हेंबर 2021 रोजी प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. त्याचं प्रत्यक्ष बांधकाम १ फेब्रुवारीपासून सुरू झालं. या प्रकल्पाशी निगडित एका अधिकाऱ्यानं सांगितलं, “हायब्रिड बांधकाम तंत्रज्ञानासह कायमस्वरूपी आणि पूर्णपणे कार्यरत असलेल्या सात मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण करणारा हा एक अनोखा आणि देशातील पहिलाच विक्रम आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.