हैदराबाद, 4 जुलै : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारी (3 जुलै 22) तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) पार पडली. या बैठकीतल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर (Hyderabad to be Renamed Bhagyanagar? ) केला. पंतप्रधानांनी असा उल्लेख केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि हैदराबादचं नाव बदलून आता भाग्यनगर होणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं.
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, ‘ भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाऊ पटेलांनी (Sardar Vallabhbhai Patel) तत्कालीन हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात समाविष्ट करून घेत ‘एक भारत’ (United India) या संकल्पनेची पायाभरणी केली. आता देशाला ‘श्रेष्ठ भारत’ (‘Shreshtha Bharat’) करण्याची ऐतिहासिक जबाबदारी भाजपची आहे .’
नायब तहसीलदाराच्या पत्नीने उचलले हे टोकाचे पाऊल, जवळच्या डायरीत मिळाली..
‘पंतप्रधानांनी हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा केला आहे आणि तेच नाव आपल्याला सुपरिचित आहे. सरदार पटेलांनी एक भारतचा पाया हैदराबादेत रचला आणि आता देशाला श्रेष्ठत्वापर्यंत नेण्याची जबाबदारी पार पडण्याचं काम भाजपचं आहे. देशात असलेली प्रत्येक उत्तम गोष्ट ही देशातील प्रत्येक भारतीयाची आहे असा भाजपचा विश्वास असल्याने भाजप पटेल यांच्या कार्याचा गौरव करतं,’ असं भाजप नेते रविशंकर यादव यांनी पंतप्रधानांच्या भाषणाबद्दल सांगितलं.
या कार्यकारिणी (BJP National Executive 2022) बैठकीला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हैदराबादच्या नामांतराबद्दल आपलं मत व्यक्त केलं. सूत्रांनुसार ते म्हणाले, ‘ सध्या के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता आहे. निवडणुकीनंतर जेव्हा भाजपची सत्ता येईल तेव्हा भाजपचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळात हैदराबादच्या नामांतराबद्दल चर्चा करतील आणि निर्णय घेतील.’
दोनच दिवसांपूर्वी झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रघुवर दास यांनी म्हटलं होतं की जर तेलंगणामध्ये आगामी निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आली तर हैदराबादचं नाव भाग्यनगर केलं जाईल. सध्या ज्या राज्यांत भाजप सत्तेत नाही त्या राज्यांत सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रणनीतिनुसार भाजपने यंदा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये आयोजित केली होती, असंही बोललं जात आहे.
लेखकाचं अभिनेत्रीसोबत धक्कादायक कृ्त्य, लग्नाचे आश्वासन देऊन लिव्ह इनमध्ये राहिला अन् मग..
‘देशाच्या विकासासाठी समर्पितपणे कष्ट करणारे लोक अशी तेलंगणातील नागरिकांची जगभर ख्याती आहे. तेलंगणाचा सर्वसमावेशक विकास (Holistic Development of Telangana) करणं याला भारतीय जनता पक्षाचं प्राधान्य आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्राला अनुसरून भाजप तेलंगणाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणा म्हणले.
पुढच्या वर्षी तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेसाठी भाजप प्राधान्य देत असल्याचंच पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय. दोन दिवस झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी संघटनात्मक कामगिरीचा आढावा घेतला. मोदी सरकारची कामं आणि सरकारच्या आर्थिक धोरणांचं कौतुक या वेळी करण्यात आलं. दरम्यान, राजस्थानातील उदयपूरमधील शिंपी कन्हय्यालाल याची इस्लामी दहशतवाद्यांनी केलेली हत्या याविषयी बैठकीत चर्चा झाली नाही. कन्हय्यालाल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पण त्यात नुपूर शर्मांचं वक्तव्य किंवा इतर कुठल्याही संदर्भाचा उल्लेख टाळण्यात आल्याची माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.