Home /News /news /

लेखकाचं अभिनेत्रीसोबत धक्कादायक कृ्त्य, लग्नाचे आश्वासन देऊन लिव्ह इनमध्ये राहिला अन् मग..

लेखकाचं अभिनेत्रीसोबत धक्कादायक कृ्त्य, लग्नाचे आश्वासन देऊन लिव्ह इनमध्ये राहिला अन् मग..

शुटिंगवरुन परतत असताना सर्वजण बिलासपूर येथे उतरले. रात्री झाल्याने नारायण साहूने तिला आपल्या घरी यायला सांगितले.

    बिलासपूर, 4 जुलै : छत्तीसगडमधील बिलासपूर (Bilaspur Chhattisgarh) जिल्ह्यात राहणाऱ्या एका पटकथा लेखकावर (Script Writer) गंभीर आरोप झाले आहेत. अभिनेत्रीसोबत दुष्कर्म केल्याप्रकरणी पटकथा लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Physical Abused by script writer on actress) त्याला अभिनेत्रीसोबत त्याच्याच घरात बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. बलात्कार केल्यावर काय घडलं -  बलात्कारानंतर जेव्हा अभिनेत्री पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जाऊ लागली तेव्हा पटकथा लेखकाने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर दोघेही लिव्ह-इनमध्ये एकत्र राहू लागले. मात्र, तरीही आरोपी पटकथा लेखक लग्नाच्या मुद्द्याला पुढे ढकलत राहिला. त्यामुळे अभिनेत्रीने त्याच्याविरोधात मस्तूरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर बिलासपूरमधील मस्तुरी पोलीस ठाण्यात छत्तीसगढी चित्रपटांच्या अभिनेत्रीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरुन चार जणांविरोधात कलम 376 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या शोधात आहेत. माहितीनुसार, जांजगीर चंपा जिल्ह्यातील 23 वर्षीय तरुणी छत्तीसगढ़ी चित्रपटात अभिनेत्री आहे. कामादरम्यान तिची ओळख छत्तीसगढी चित्रपटांमधील पटकथा लेखक आणि बिलासपूर जिल्ह्यातील वेद परसादा, मस्तुरी येथील रहिवासी नारायण साहू याच्याशी झाली. आरोपी एक चित्रपट तयार करत आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल 2021मध्ये पीडित अभिनेत्री आपली एक मैत्रीण, नारायण साहू आणि त्याचा सहकारी नारायण भोईसोबत एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रायपूर येथे गेली होती. शुटिंगवरुन परतत असताना सर्वजण बिलासपूर येथे उतरले. रात्री झाल्याने नारायण साहूने तिला आपल्या घरी यायला सांगितले. एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्याने तिच्यावर भरवसा ठेवला. तसेच घरी पोहोचल्यानंतर आरोपीने अभिनेत्री आणि तिच्या मैत्रिणीला एक रुम दिला. तसेच तो आपल्या मित्रासोबत दुसऱ्या रुममध्ये चालला गेला. मात्र, काही वेळानंतर नारायण साहू आपल्या एका मित्रासोबत आला. त्याने अभिनेत्रीच्या मैत्रिणीला एका रुममध्ये बंद करुन दिले. यानंतर त्याने अभिनेत्रीवर बलात्कार केला. हेही वाचा - तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या गोळ्या! यानंतर सकाळी अभिनेत्रीने पोलीस तक्रारीसंदर्भात आरोपीला सांगितले तर त्याने तिला लग्नाचे वचन दिले. आरोपीच्या प्रस्तावाला अभिनेत्रीने बलात्कारानंतरही होकार दिला. यानंतर दोन्ही जण लिव्ह-इनमध्ये राहू लागले. मार्च 2022 पर्यंत दोन्ही सोबत राहिले. मात्र, आरोपी लग्नाचा विषय नेहमी टाळत राहिला. त्यामुळे अभिनेत्रीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर 2 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chhattisgarh, Crime news, Rape

    पुढील बातम्या