करनाल, 4 जुलै : हरयाणा राज्यातील करनालमध्ये
(Karnal woman suicide) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील तरवडी येथील मंडई पर्यवेक्षक मुक्ती यांनी गळफास घेऊन आत्महत्या
(Woman Suicide) केली. मुक्ती या तरवाडीतच सरकारी फ्लॅटमध्ये राहायची. जिथे त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
(Deputy tahsildar woman suicide) मृतदेहाजवळ एका डायरीत सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये मुक्ती यांनी तिच्या मृत्यूची जबाबदारी तिच्या पतीला सांगितली आहे.
काय आहे प्रकरण -
मुक्ति यांनी सुसाईड नोटमध्ये
(Suicide note) लिहिले आहे की, त्या कुटुंबातील कोणीही माझ्या संस्कारात सहभागी होऊ नये. मुक्ती ही तरवडी मंडीत पर्यवेक्षक होत्या. दुसरीकडे, मुक्ती यांच्या पती नायब तहसीलदार आहे. त्यांचे नाव अचिन आहे. ते बरहडा, भिवानी येथे सेवेत कार्यरत आहेत. दोघांच्या लग्नाला जवळपास दीड वर्षे झाली होती. मात्र, दोघांमध्ये कसलेही बनत नव्हते. याच कारणामुळे सध्या दोघेही वेगळे राहत होते.
हेही वाचा - लेखकाचं अभिनेत्रीसोबत धक्कादायक कृ्त्य, लग्नाचे आश्वासन देऊन लिव्ह इनमध्ये राहिला अन् मग..
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला -
त्यामुळे रविवारी सकाळी मुक्ति यांनी गळफास घेत आपले जीवन संपवले. तसेच या आत्महत्येला तिने आपल्या पतीला जबाबदार धरले आहे. मुक्ति यांच्या मृतदेहाजवळून सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर हा मृतदेह मृताच्या नातेवाईकांना अंतिम संस्कारासाठी देण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.