• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पाकच्या कुरापती सुरूच; 'हायब्रिड' दहशतवाद्यांकडून काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांच्या हत्या

पाकच्या कुरापती सुरूच; 'हायब्रिड' दहशतवाद्यांकडून काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांच्या हत्या

जम्मू -काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या (Pakistani Terror Outfits) इशाऱ्यावर नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. पाकिस्तानी संघटना या हल्ल्यांमध्ये काश्मीरमधील हायब्रिड किंवा अर्धवेळ दहशतवाद्यांचा वापर करत आहेत

 • Share this:
  नवी दिल्ली 08 ऑक्टोबर : जम्मू -काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या (Pakistani Terror Outfits) इशाऱ्यावर नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. उच्च सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी संघटना या हल्ल्यांमध्ये काश्मीरमधील हायब्रिड किंवा अर्धवेळ दहशतवाद्यांचा वापर करत आहेत (Terrorist Attacks in Kashmir). हे अर्धवेळ किंवा हायब्रिड दहशतवादी (Hybrid Terrorists) सामान्य नोकरी करतात आणि लहान शस्त्रे म्हणजेच पिस्तुलांनी नागरिकांना लक्ष्य करत आहेत. हल्ल्यानंतर ते त्यांचे सामान्य जीवन जगू लागतात. सुरक्षा दलांना अशा तरुणांविषयी माहिती मिळाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अशा तरुणांची ओळख वेगाने केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत काश्मीरमध्ये पाच नागरिकांचा बळी गेला आहे. यानंतर खोऱ्यात वाढत्या दहशतवादाबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ झुकला इस्रायल, वाचा 100 वर्षांपूर्वी काय घडलं काश्मीरच्या स्थानिक मूल्यांना बदनाम करण्याचे हे एक मोठे षड्यंत्र - डीजी दिलबाग सिंह या घटनांवर जम्मू -काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह म्हणतात, “अलीकडील घटना लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी केल्या जात आहेत. या घटनांचा उद्देश परिसरातील जातीय सलोखा बिघडवणे आहे. काश्मीरच्या स्थानिक मूल्यांना बदनाम करण्याचे हे मोठे षड्यंत्र आहे. पाकिस्तानी एजन्सींच्या सांगण्यावरून हे केले जात आहे. हायब्रिड दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे - आयजी विजय कुमार काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले, या वर्षी आतापर्यंत 28 नागरिक मारले गेले आहेत, त्यापैकी 5 स्थानिक हिंदू-शीख समुदायाचे आहेत. पूर्वी पोलीस आणि सुरक्षा दलांच्या कडक कारवाईमुळे आता दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली आहे. हे हल्ले नवीन लोकांकडून केले जात आहेत. या सर्वांची ओळख पटवली जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. NDA पाठोपाठ आता राष्ट्रीय मिलिट्री कॉलेज आणि शाळांमध्ये मिळणार महिलांना प्रवेश 'द रेझिस्टन्स ग्रुप' (TRF) ही दहशतवादी संघटना नागरिकांच्या हत्यांच्या संदर्भात चर्चेत आली आहे. काश्मिरी व्यापारी माखनलाल बिंद्रू आणि अन्य दोन नागरिकांच्या हत्येची जबाबदारी संघटनेने स्वीकारली आहे. दहशतवादी संघटना टीआरएफ ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची आघाडी मानली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीआरएफचे ओव्हरग्राउंड कामगार पूर्णपणे मुख्य कॅडरमध्ये बदलले आहेत आणि लोकांना लक्ष्य करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: